मोठ्या पावसाची प्रतीक्षा...

By Admin | Updated: July 16, 2014 00:49 IST2014-07-16T00:26:29+5:302014-07-16T00:49:41+5:30

उस्मानाबाद : अर्धा जुलै महिना सरला तरीही जिल्हावासियांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Waiting for big rains ... | मोठ्या पावसाची प्रतीक्षा...

मोठ्या पावसाची प्रतीक्षा...

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे आर्ट आॅफ लिव्हिंग या सामाजिक संघटनेकडून विविध उपक्रमांबरोबर आता वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली आहे. पर्यावरण संतुलनासाठी पुढाकार घेत गावामध्ये पंधरा हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प या संघटनेच्या स्वयंसेवकांनी केला आहे.
गुरू पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झालेल्या ध्यानयोग शिबिरामध्ये संघटनेच्या सदस्यांनी हा संकल्प केला असून गोरेगावसह पसिरातील गावामध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे मागील दोन वर्षापासून श्री श्री रवीशंकर यांच्या मार्गदर्शनात चालविल्या जात असलेल्या दि आर्ट आॅफ लिव्हिंग या सामाजिक संघटनेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये अधून-मधून योग प्राणायाम शिबिरांचे आयोजन तसेच आठवड्यात दर गुरूवारी सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून मागील वर्षी गाव हागणदरीमुक्त करण्याच्या संकल्पातूने निर्मलग्राम अभियान राबविण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. यासाठी ग्रामस्थांमधून मोठा प्रतिसाद मिळाल्याने सध्या गावांमध्ये या अभियानाचे काम प्रगतीपथावर आहे.
मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या असमतोलपणामुळे पावसात आलेली अनियमितता विविध घटकांवर परिणाम करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. यासाठी पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्देशाने गोरेगाव येथील दि आर्ट आॅफ लिव्हींग सामाजिक संघटनेने पुढाकार घेत वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. १२ जुलै रोजी गुरू पौर्णिमेच्या दिवशी पार पडलेल्या ध्यान योग शिबिरामध्ये संघटना सदस्यांनी गावामध्ये पंधरा हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये आंबा, लिंब, पिंपळ, चिंच आदी वृक्षांची रोपे, नर्सरीमधून उपलब्ध करून गावांमधील रस्त्यांवर तसेच प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर वृक्ष लागवड चांगला पाऊस पडताच केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे सदस्य उपसरपंच डॉ. रवी पाटील यांनी दिली आहे. सदर मोहिम राबविण्यासाठी सामाजिक संघटनेत सहभागी असलेले माजी पं.स. सभापती डॉ. आर.जी. कावरखे, उपसरपंच डॉ. रवी पाटील, डॉ. मनिषा पाटील, अर्चना जिरवणकर, साधनाताई कावरखे, विद्या कावरखे, छाया कावरखे, उज्वला कावरखे, गजानन गिरे, विजय कावरखे, जी.एम. खिल्लारी, राजकुमार कावरखे, अशोक कावरखे, संजय कावरखे, नंदू कावरखे यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Waiting for big rains ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.