सहा चारा छावण्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: September 15, 2015 00:20 IST2015-09-14T00:37:34+5:302015-09-15T00:20:34+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ११ संस्थांनी चारा छावणीसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

सहा चारा छावण्या मंजुरीच्या प्रतीक्षेत
लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ११ संस्थांनी चारा छावणीसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. एकूण प्रस्तावापैकी फक्त पाच प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असून, उर्वरित ६ चारा छावण्यांचे प्रस्ताव मात्र मंजुरीच्या प्रतीक्षेत रखडले आहेत.
लातूर जिल्ह्यात ६ लाख १५० पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातून ११ संस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे पूर्ण कागदपत्रांची परिपूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु, यातील पाच प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. लातूर तालुक्यातील एक, निलंगा तालुक्यातील तुपडी, औसा तालुक्यातील आशिव, माळकोंडजी, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा या ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. या चारा छावण्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी ४४ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. परंतु, या निधीचे अद्यापपर्यंत वाटप झाले नसल्याने चारा छावण्या सुरू केलेल्या संस्थांना चारा उपलब्ध करण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार प्रस्ताव आले आहेत. परंतु, मंजुरी मिळत नाही. (प्रतिनिधी)