शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रेल्वे प्रकल्पांबाबत मराठवाड्याच्या पदरी पुन्हा ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:16 IST

रेल्वे प्रश्नांना खोडा : दौलताबाद- चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव नवीन रेल्वे मार्ग, परभणी-मनमाड दुहेरीकरणाचा विसर

ठळक मुद्देपरभणी- मनमाड रेल्वेमार्ग दुहेरीकरर्णाचाही अर्थसंकल्पात विचार केला नाही. मनमाड- मुदखेड- धोन विद्युतीकरणास : 50,00,00,000सोलापूर- उस्मानाबाद- तुळजापूरसाठी : 1,00,00,000

औरंगाबाद : अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पाचव्या दिवशी बुधवारी रेल्वेचे पिंक बुक जाहीर झाले. सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांना तुंटपुज्या निधीशिवाय मराठवाड्याच्या पदरी फारसे काही पडले नाही.  

प्रस्तावित दौलताबाद- चाळीसगाव रेल्वेमार्ग आणि रोटेगाव- कोपरगाव रेल्वेमार्गासाठी निधी मिळाला नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ८१.४३ कि.मी.च्या परभणी- मुदखेडदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आहे. या दुहेरीकरणासाठी ७५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. 

परभणी- मनमाड रेल्वेमार्ग दुहेरीकरर्णाचाही अर्थसंकल्पात विचार केला नाही. औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, तिरुपती रेल्वेस्टेशनचा पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने विकास केला जाणार आहे. या चार स्टेशनसाठी १ कोटी ४६ लाख ५० हजारांचा निधी देण्यात आला. त्यामुळे एवढ्या निधीत त्यांचा कसा विकास होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनमाड- औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या नूतनीकरणासाठी दोन वर्षांपासून निधीच देण्यात आलेला नाही. औरंगाबादेत पीटलाईनच्या मागणीचाही विचार केलेला नाही. 

मनमाड- मुदखेड- धोन विद्युतीकरणास : 50,00,00,000मनमाड- मुदखेड- धोन या ८६८ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्याप प्रतीक्षा आहे. 

सोलापूर- उस्मानाबाद- तुळजापूरसाठी : 1,00,00,000सोलापूर- उस्मानाबाद- तुळजापूर या नव्या रेल्वेमार्गासाठी अवघ्या १ कोटीची तरतूद करण्यात आली. यातूनही केवळ सर्वेक्षणच होण्याची शक्यता आहे. 

अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काहीही मिळाले नाही. त्यामुळे एक वर्ष वाया गेले आहे. प्रशासनाने अर्थसंकल्पासाठी वेळीच मागण्या पाठविल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ ओढावली. - ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वेविकास समिती 

मराठवाड्यात रेल्वे प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. - अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती 

रेल्वेस्टेशनच्या इमारतीसाठीही समाधानकारक निधी मिळाला नाही. दुहेरीकरणाचा उल्लेखही नाही. - राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेbudget 2020बजेटMarathwadaमराठवाडा