‘वाडी’एका तर ग्रामपंचायत दुसऱ्या मतदारसंघात

By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:16:13+5:302014-07-16T01:25:19+5:30

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर ग्रामपंचायतीचे चार प्रभाग एका मतदारसंघात तर पाचवा प्रभाग विधानसभेच्या दुसऱ्या मतदारसंघात असे चित्र पहावयास मिळणार आहे़

In 'Wadi', the Gram Panchayat is the second constituency | ‘वाडी’एका तर ग्रामपंचायत दुसऱ्या मतदारसंघात

‘वाडी’एका तर ग्रामपंचायत दुसऱ्या मतदारसंघात

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर
ग्रामपंचायतीचे चार प्रभाग एका मतदारसंघात तर पाचवा प्रभाग विधानसभेच्या दुसऱ्या मतदारसंघात असे चित्र पहावयास मिळणार आहे़ लोकशाहीचा जयजयकार करीत मतदानाचा डांगोरा वाजविणाऱ्या मतदारांना हक्क गाजविण्यासाठी प्रबोधनाचे डोस पाजविले जात असताना अशा विचित्र रचनेसाठी मतदान तरी का करायचे ? असा प्रश्न धोतरवाडीच्या नागरिकांना पडला आहे़
उदगीर तालुक्यात देवर्जन ग्रामपंचायतीच्या हद्दीत देवर्जनसह हणमंतवाडी व धोतरवाडी या दोन वाड्या समाविष्ठ आहेत़ या ग्रामपंचायतीचे एकूण पाच प्रभाग असून, देवर्जन गावासाठी तीन तर हणमंतवाडी व धोतरवाडीसाठी प्रत्येकी एक प्रभाग आहेत़ देवणी तालुका निर्मितीपासून या वाडीच्या छळ कथेला सुरूवात झाली़ त्याचा परिणाम म्हणून या वाडीच्या नागरिकांना आता थेट निलंगा मतदारसंघात ढकलून दिले असल्याने हे गाव विकासापासून वंचित राहणार आहे़
देवणी तालुक्यात या धोतरवाडीचा समावेश केल्यानंतर गावकऱ्यांनी याच प्रश्नाने त्रस्त असलेल्या आरसनाळ व कुमदाळ या ग्रामस्थांच्या मदतीने आपले गाव पुन्हा उदगीर तालुक्यात आणण्यात यश मिळविले आहे़ त्यासाठीही कित्येक वर्षाचा कालावधीत अन् संघर्ष गावकऱ्यांच्या नशिबी आला़ परिणामी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही वाडी आता निलंगा विधानसभा मतदारसंघाशी जोडली गेली आहे़ ग्रामपंचायत देवर्जन ही उदगीर तालुक्यात पंचायत समितीसाठी व तहसीलसाठी अधिसूचनेनंतर उदगीर तालुका विधानसभेसाठी़
मात्र कुठलाही संबंध नसलेला निलंगा मतदारसंघ असे विचित्र त्रांगडे सध्या धोतरवाडीकरांच्या गळ्यात मारण्यात आली आहे़ १४०० लोकवस्ती असलेल्या या वाडीचा समावेश उदगीर मतदारसंघात व्हावा, यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले खरे़ मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग नावाच्या देवाकडे बोट दाखवून काहीही करण्यास असमर्थता व्यक्त केली़
ऐरवी छोट्या मोठ्या प्रश्नावर प्रक्षोभक बोलणारे पत्रक पुढारीसुद्धा यापासून दूर राहिले़ याप्रश्नी न्याय मागायचा तरी कोठे, असा सवाल धोतरवाडी ग्रामस्थांना सतावत आहे़
प्रस्ताव पाठविला आहे
उदगीर तालुक्यातील धोतरवाडी, कुमदाळ व आरसनाळ या तीन गावांचा उदगीर विधानसभा मतदारसंघात समावेश करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती उदगीरचे नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी दिली़
मतदानासाठी व मतदारांसाठी वारंवार आवाहने करणारा व नि:पक्षपातीपणाचा दावा करणारा निवडणूक आयोग तरी याबाबत लक्ष घालून ही गावे उदगीर विधानसभा मतदारसंघाला जोडणार का अशी आशा आहे़

Web Title: In 'Wadi', the Gram Panchayat is the second constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.