वडगाव जि. प. शाळेच्या वोस्का प्रयोगशाळेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST2021-01-16T04:05:07+5:302021-01-16T04:05:07+5:30

बजाज समाजसेवा केंद्र व शिक्षणाधिकारी सूरज प्रसाद जयस्वाल यांच्या प्रयत्नांतून वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत वोस्का (वुमन ऑर्गनायझेशन ...

Wadgaon Dist. W. Inspection of the school's voska laboratory | वडगाव जि. प. शाळेच्या वोस्का प्रयोगशाळेची पाहणी

वडगाव जि. प. शाळेच्या वोस्का प्रयोगशाळेची पाहणी

बजाज समाजसेवा केंद्र व शिक्षणाधिकारी सूरज प्रसाद जयस्वाल यांच्या प्रयत्नांतून वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत वोस्का (वुमन ऑर्गनायझेशन फॉर सोशल कल्चर अवेरनस) संस्थेच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या विज्ञान प्रयोगशाळेची उपयुक्तता तपासण्यासाठी नुकतीच बजाज सीआरसी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत लॉकडाऊन काळातील ऑनलाईन अध्ययन अध्यापनाची माहिती घेत शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्स ॲप समूहावर विद्यार्थ्यांनी पाठवलेले विविध विज्ञान प्रयोगाची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांनी पदाधिकाऱ्याने पुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र रामटेके तर सचिन वाघ यांनी आभार मानले. याप्रसंगी बजाज व वोस्काचे रणजित थोरवडे, समाधान शिंदे, अनिता देशमुख, ऐश्वर्या मोहिते, सुवर्णा इंगळे यांच्यासह शाळेतील पदमसेना नागदेवे, दीपाली काळबांडे, सुवर्णा शिंदे, हेमलता जाधव, सोनाली निकम, मंगल गाडेकर, लईक शेख आदींची उपस्थिती होती. सुनील चिपाटे यांनी सांगितले की, बजाज ऑटोच्या सी.एस.आर. फंडातून वोस्का संस्थेचा लाईफ-लॅब प्रकल्पाची अंमलबजावणी व शिक्षकांना प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्याच्या मनातील विज्ञान विषयाची भीती दूर व्हावी व त्यांच्यामध्ये या विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी, या हेतूने जिल्ह्यातील महापालिकेच्या १९ शाळा, जि.प.च्या ८ व निमशासकीय ५ अशा एकूण ३२ शाळांमध्ये मॉडेल क्लासरूम तयार केल्या आहेत. वोस्का या संस्थेने विज्ञान विषयाचे ८१ डेमो मॉडेल तयार केले आहेत. या मॉडेलचे मॅपिंग शालेय पाठ्यपुस्तकांबरोबर केल्याने विद्यार्थी व शिक्षकांना ज्ञानार्जन करताना मदत होणार आहे. मनपा व जि.प.च्या ७ हजार ६१२ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होणार असल्याचे मुख्याध्यापक चिपाटे यांनी सांगितले.

फोटो ओळ

वडगाव कोल्हाटी जि. प. शाळेच्या वोस्का विज्ञान प्रयोगशाळेस बजाज समाजसेवा केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Wadgaon Dist. W. Inspection of the school's voska laboratory