उदगीर बाजार समितीसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 00:22 IST2017-04-02T00:16:39+5:302017-04-02T00:22:43+5:30

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज दि़ २ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़

Voting today for the Udgir Bazar Samiti | उदगीर बाजार समितीसाठी आज मतदान

उदगीर बाजार समितीसाठी आज मतदान

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज दि़ २ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़ उदगीर शहर व तालुक्यातील १७ मतदान केंद्रांवर एकूण ३३८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत़
ग्रामपंचायत मतदारसंघातून ७५८ मतदार मतदान करणार आहेत़ यासाठी वाढवणा मतदान केंद्रावर १४७, मोघा ७८, नागलगाव ११६, नळगीर ९१, देवर्जन ९८, उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कूल १३६, हेर ९२ अशी मतदान केंद्र रचना करण्यात आलेली आहे़
सोसायटी मतदारसंघातून वाढवणा येथे १४०, मोघा १०३, देवर्जन १२९, उदगीर येथील विद्यावर्धिनी हायस्कुल १००, हेर १०३ असे एकुण ७९२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ व्यापारी मतदार संघासाठी बाजार समितीच्या कार्यालयात दोन मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून या केंद्रांवर १३७८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत़
शेतकी निवास येथे हमाल मापाडी मतदारसंघाचे मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे़ या केंद्रावर ४५५ मतदान होणार आहे़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए़ एस़ कदम काम पाहत आहेत़ प्रशासनिक स्तरावर १०० मतदान कर्मचारी कार्यरत राहणार असून २१ पोलीस कर्मचारी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असणार आहेत़

Web Title: Voting today for the Udgir Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.