वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:37 IST2019-06-22T20:37:29+5:302019-06-22T20:37:40+5:30
वाळूज ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी रविवारी (दि.२३) मतदान होणार आहे.

वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी रविवारी (दि.२३) मतदान होणार आहे. या निवडणुकीत तीन उमेदवार आपले भविष्य आजमावत असून, २ हजार २९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष तुपे यांच्या गतवर्षी अकाली निधनमुळे सरपंच व सदस्यपद रिक्त झाले होते. यानंतर झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पपीन माने यांची निवड झाली होती. दरम्यान, सरपंच तुपे यांच्या निधनानंतर निवडणूक विभागाच्या वतीने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला.
रविवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीत संदीप तुपे, अनिल भुजंग व विजय भालेराव हे रिंगणात आहेत. येथील साईनाथ विद्यालयात दोन बुथवर मतदान होणार असून, एकुण २२९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती तलाठी अशोक कळसकर यांनी दिली. मतमोजणी सोमवारी होणार आहे.