महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:17 IST2017-10-10T00:17:43+5:302017-10-10T00:17:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महापौर निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवारालाच मतदान करावे, सेनेसोबत युतीधर्म पाळावा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री ...

महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान करा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवारालाच मतदान करावे, सेनेसोबत युतीधर्म पाळावा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिले. सेनेसोबत युती तोडून स्वतंत्र उमेदवार देण्याचा अजिबात विचार करू नका, असाही सल्ला त्यांनी दिला. ‘लोकमत’ने शनिवार ७ आॅक्टोबरच्या अंकात ‘महापौर निवडणुकीसाठी भाजप उमेदवार देणार नाही’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. ‘लोकमत’ने दिलेले वृत्त आज खरे ठरले.
नांदेड महापालिकेनिमित्त प्रचार सभा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उच्चशिक्षणमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. आ. अतुल सावे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, महापौर बापू घडमोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिरीष बोराळकर, माजी सभापती दिलीप थोरात, नगरसेवक कचरू घोडके, माजी नगरसेवक जगदीश सिद्ध यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते.