शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान सुरु; सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:31 AM

मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता.

ठळक मुद्देगोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी १९ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता. दरम्यान, आज सकाळी १० वाजेपर्यत केवळ ३ टक्के मतदान झाले आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासह एक अपक्ष या निवडणुकीच्या मैदानात आहे. २२ आॅगस्ट रोजी मेल्ट्रॉन कंपनी चिकलठाणा येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. महायुतीचे बहुमत या निवडणुकीत असून सर्व मतदारांना रविवारी दुपारी ३ वा. इगतपुरी येथील विवांत रेसॉर्टमधून औरंगाबादकडे रवाना करण्यात आले. तसेच आघाडीतील काही मते फोडल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत असून, शिर्डीमध्ये काही मतदारांना रविवारी दिवसभर थांबविण्यात आले होते. ते मतदार १९ रोजी सकाळी थेट मतदान केंद्रावरच दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. पहिली आणि दुसरी पसंती देण्याबाबत युतीमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. तत्पूर्वी शनिवारी इगतपुरीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी मतदान कसे करायचे, मतपत्रिकेवर शिक्का कुठे मारायचा, याचे प्रशिक्षण मतदारांना दिले. 

गोपनीयता भंग होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क २०१३ साली झालेल्या निवडणुकीत किचैन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अमलात आणले जाणार आहेत. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साहाय्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. 

दोन्ही जिल्ह्यांत १७ मतदान केंद्रेऔरंगाबादमध्ये ९, तर जालन्यात ८ असे एकूण १७ मतदान केंद्र या निवडणुकीसाठी असतील. सर्वाधिक १३८ इतके मतदान औरंगाबाद तहसील कार्यालयात आहे. यावर्षी पहिल्यांदाच तहसील कार्यालय हद्दीमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गटबाजी, फोडाफोडीला आळा बसणार आहे.

अंदाजे पक्षीय बलाबल असे पक्ष    मतदार भाजप    १८९शिवसेना    १४१    काँग्रेस    १७०राष्ट्रवादी काँग्रेस    ०८०एमआयएम    ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष    ०४९एकूण    ६५७

राजकीय                   समीकरणनिहाय मतदानमहायुती    ३३०महाआघाडी    २५०एमआयएम-अपक्ष    ०७७एकूण    ६५७ 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना