मतदारांची नोटाला पसंती
By Admin | Updated: October 22, 2014 01:17 IST2014-10-22T00:48:26+5:302014-10-22T01:17:30+5:30
जालना : १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या पाचही विधानसभा मतदार संघात आयोगाने जनतेला दिलेला ‘नोटा’ या पर्यायचा मोठ्या प्रमाणात वापर करून तब्बल सात हजार मतदारांनी ‘

मतदारांची नोटाला पसंती
जालना : १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या पाचही विधानसभा मतदार संघात आयोगाने जनतेला दिलेला ‘नोटा’ या पर्यायचा मोठ्या प्रमाणात वापर करून तब्बल सात हजार मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.
पाचही मतदान संघाची मतमोजणी रविवारी करण्यात आली. त्यात जवळपास ७ हजार ६४६ मतदारांनी नोटाचा वापर करत उमेदवारांच्या विरोधात कौल दिला. त्यात परतूर तालुक्यातील मतदारांनी २ हजार ११५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार एकूण ७७ उमेदवार रिंंगणात होते. यात काँगे्रस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, मनसे, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारिप आदी पक्षांचे उमेदवार आपले नशीब आजमावत होते. आयोगाच्या वतीने यंदा उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय मतदारांना देण्यात आला. निवडणुकीत उभे असलेले उमेदवार पसंत नसल्यास मतदारांना ‘नोटा’ चे बटण दाबावे, असा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ७ हजार ६४६ मतदारांनी ‘नोटा’ या बटणाचा पर्याय वापरून उमेदवारांना नाकारले. या सर्वाधिक ‘नोटा’ंचा वापर परतूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला. तर सर्वात कमी नोटांचा वापर घनसावंगी मतदारा संघात झाला. जिल्हात एकूण पाचही विधानसभा मतदारसंघात मतदारांनी ‘नोटा’ या बटनाचा वापर करुन आपला रोष व्यक्त केला. हा पर्याय दिल्याने मतदारांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांना दिलेले उमेदवार पसंत नसतात. त्यामुळे त्यांना नाकारण्याचा अधिकार आता मतदारांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)