शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

मतदाता तुपाशी... करदाता उपाशी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 2:26 PM

विश्लेषण : मनपाची हद्द वाढली. उत्पन्नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. आजही मनपाच्या तिजोरीत जेमतेम ६०० ते ७०० कोटी रुपये येतात. यंदा अर्थसंकल्प १८०० कोटींचा तयार करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करायचे म्हटल्यास किमान तीन वर्षे मनपाला लागतील.

- मुजीब देवणीकर

शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, शहर स्मार्ट झाले पाहिजे, स्वच्छता अभियानात राष्ट्रीय पातळीवर शहर टॉप टेनमध्ये यावे, अशा राजकीय गप्पा औरंगाबादकरांच्या कानावर एक हजार वेळेस आलेल्या आहेत. महापालिकेतील राजकीय मंडळी भाषणे सुंदर करतात...प्रत्यक्षात त्यांची कृती निराळीच आहे. मागील तीन दशकांपासून मतदार राजा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नगरसेवक काम करीत आहे. हा मतदार मालमत्ता कर भरत नाही, पाणीपट्टी तर अजिबातच नाही. तरीही त्याला अत्यंत व्हीआयपी सोयी- सुविधा महापालिका देत आहे. प्रामाणिकपणे महापालिकेने मागण्यापूर्वीच कर भरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यांना कचरा, पाणी प्रश्न, पथदिवे, अशा मूलभूत सोयी- सुविधा मिळण्यासाठी मनपाकडे संघर्ष करावा लागतोय. मतदाता तुपाशी अन् करदाता उपाशी...अशी अवस्था महापालिकेने करून ठेवली आहे.

महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका १९८८ मध्ये घेण्यात आल्या. तेव्हा शहर छोटे होते. शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविताना मनपाची दमछाक होत नव्हती. शहर झपाट्याने वाढू लागले. अनधिकृत वसाहतींची संख्याही तेवढ्याच झपाट्याने वाढू लागली. त्यात महापालिकेने १९९५ मध्ये १८ खेड्यांचा महापालिकेत समावेश केला. त्यानंतर २००६ मध्ये सिडको-हडको मनपात घेतले. दोन वर्षांपूर्वी सातारा-देवळाईचा मनपात समावेश करण्यात आला. मनपाची हद्द वाढली. उत्पन्नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. आजही मनपाच्या तिजोरीत जेमतेम ६०० ते ७०० कोटी रुपये येतात. यंदा अर्थसंकल्प १८०० कोटींचा तयार करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करायचे म्हटल्यास किमान तीन वर्षे मनपाला लागतील.

मनपा हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रस्ते, स्वच्छ पाणी, चांगली ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे आदी मूलभूत सोयी- सुविधा मिळायलाच हव्यात. पण त्यासाठी काही निकषही असायला हवेत. आजही प्रामाणिकपणे नियमानुसार लेआऊट टाकून प्लॉटिंग विकणारे, सोसायटी करून वसाहत निर्माण करणारे भरपूर नागरिक आहेत. नियमानुसार या मंडळींनी मनपाकडे लाखो रुपये भरलेले असतात. अधिकृत वसाहतींना आजही मनपाकडून पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी सोयी-सुविधा मिळायला तयार नाहीत. नारेगाव भागातील काही वसाहतींना पिण्याच्या पाण्यासाठी खंडपीठात धाव घ्यावी लागली. २० बाय ३० ची प्लॉटिंग करून टोलेजंग इमारती बांधून राहणाऱ्यांना सिमेंटचे गुळगुळीत रस्ते, एलईडी लाईट, चांगली ड्रेनेज व्यवस्था देण्याचा आटापिटा राजकीय मंडळींकडून सुरू आहे. काही गुंठेवारी वसाहतींमध्ये पाय ठेवल्यावर तेथील सोयी-सुविधा थक्क करणाऱ्या आहेत.

विशेष बाब म्हणजे गुंठेवारी, अनधिकृत वसाहतींमधून महापालिकेला एक रुपयाचेही आर्थिक उत्पन्न मिळत नाही. दर पाच वर्षाला मिळते ते नगरसेवकाला ‘मत’ दुसरे काहीच नाही. एका मतासाठी नगरसेवक मनपाच्या तिजोरीतील लाखो रुपये अनधिकृत वसाहतींमध्ये खर्च करण्यास मोकळे... लाखो रुपये मनपाकडे भरलेल्या सोसायट्यांना मात्र, सोयी- सुविधा देण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. विशेष बाब म्हणजे सोसायट्यांमधील सर्वच मालमत्ताधारक मनपाला न चुकता कर भरतात, पाणीपट्टी भरतात, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मागील ३० वर्षांपासून ‘मत’दाता तुपाशी आणि ‘कर’दाता उपाशी, अशी अवस्था निर्माण झाली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालय हा तोडगा नाही. राजकीय मंडळींनीही आपली सदसद्विवेकबुद्धी ठेवून काम करायला हवे. ज्या अनधिकृत वसाहतींना आपण कोट्यवधींच्या सुविधा पुरवतोय त्यांच्याकडून किमान मालमत्ता कर, पाणीपट्टी तरी वसूल करून मनपाला दिली पाहिजे.

कचऱ्यासाठीही नगरसेवक जबाबदारमहापालिका कोट्यवधी रुपये कचऱ्यात खर्च करीत आहे. प्रत्येक वॉर्डाला कचरा जमा करण्यासाठी तीन रिक्षा देण्यात आल्या आहेत. एका रिक्षाचे भाडे महिना २७ हजार रुपये आहे. एवढे करूनही कचरा प्रत्येक वसाहतीच्या चौकात पडलेला दिसून येतो. ज्या भागातील नागरिक मनपाच्या रिक्षात कचरा टाकत नाहीत, त्यांना समजावून सांगण्याचे काम तेथील लोकप्रतिनिधीचे आहे. जुन्या शहरातील काही नगरसेवक सकाळी उठतच नाहीत. सूर्य डोक्यावर आल्यावर त्यांची सकाळ होते. सिडको-हडको, चिकलठाणा, रामनगर, मुकुंदवाडी आदी भागातील नगरसेवक सकाळी पाच वाजता उठून कचरा जमा करणारे, झाडू मारणारे कर्मचारी यांच्यामागे असतात. कुठे किंचितही अडचण आल्यास नगरसेवक येऊन प्रश्न सोडवितात. जुन्या शहरातच नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार होत आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरfundsनिधी