मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:04 IST2021-04-07T04:04:17+5:302021-04-07T04:04:17+5:30
फुलंब्री : नगरपंचायतमधील तीन वाॅर्डांच्या पोटनिवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी तयार करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना ...

मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर - A
फुलंब्री : नगरपंचायतमधील तीन वाॅर्डांच्या पोटनिवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी तयार करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
फुलंब्री नगरपंचायतचीची निवडणूक १३ डिसेंबर २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक झाली होती. यात भाजपच्या नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक निवडून आले होते. एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायतमध्ये भाजपचे ११, तर आघाडीचे ५ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या ११ नगरसेवकांमधील दोन नगरसेवकांचे पद शासकीय जमिनीवरील अतिक्रमण केल्याने रद्द झाले, तर एक एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाचे पद तीन अपत्यांमुळे गेले. अशा प्रकारे तीन वाॅर्डांच्या जागा रिक्त होत्या. या वाॅर्डांच्या निवडणुका
घेण्यात येणार आहेत. १९ एप्रिल रोजी तीन प्रभागांतील निवडणूक यादी प्रसिद्ध करणे आहे, तर १९ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान यादीवर हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. यानंतर यादी दुरुस्ती करण्याचे काम केले जाणार आहे. अंतिम यादी तयार झाल्यानंतर लगेच निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
तिघेही गेलेत हायकोर्टात
फुलंब्री येथील ज्या तीन नगरसेवकांचे पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले होते. त्या निर्णयाविरोधात तिन्ही नगरसेवकांनी हायकोर्टात अपील करून दाद मागितली आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत निवडणुकीसंदर्भात काय हालचाली होतात, हे पाहावे लागेल.