वीज कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजना
By Admin | Updated: August 7, 2014 23:35 IST2014-08-07T00:59:02+5:302014-08-07T23:35:57+5:30
जालना : वीज कंपनीतील ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स

वीज कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजना
जालना : वीज कंपनीतील ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे मराठवाडा संघटक पी.एम.कुलकर्णी यांनी दिली.
यासाठी कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा केला. संघटनेच्या या मागणीची दखल घेऊन महावितरण व्यवस्थापनाने महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय आदेश क्र.४९४ दि.३१ जुलै १४ नुसार परिपत्रक काढले आहे. पात्र कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी विज कामगारांची सेवा दोन वर्षे बाकी असणे आवश्यक आहे. व विज कंपनीमध्ये नियमित सेवा २५ वर्षे पुर्ण झालेली पाहीजे. पाल्य पदवीधारक व आय.टी.आय. उत्तीर्ण पाहीजे. तसेच कामगारांमध्ये या स्वेच्छा निवृत्ती योजनेसंबंधी काही संभ्रम त्यांच्यासाठी
स्वेच्छा निवृत्ती योजना घेऊ इच्छिणाऱ्या कामगारांसाठी दि.८ आॅगस्ट रोजी १२ वाजता येथील संघटनेच्या कार्यालयात वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस सी.एन.देशमुख, मराठवाडा संघटक पी.एम.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी झोनल अध्यक्ष जे.सी.डोळसे, उपझोन सचिव अर्जुन लहाने, सर्कल सचिव आयाजखान पठाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.कामगारांनी या योजनेविषयी मार्गदर्शन घेण्याकरीता उपस्थित राहण्याचे आवाहन वर्कर्स फेडरेशनचे झोनल अध्यक्ष जे. सी.डोळसे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)