विझोरा तलावास गळती
By Admin | Updated: September 28, 2014 00:41 IST2014-09-28T00:25:13+5:302014-09-28T00:41:06+5:30
वालसावंगी/धावडा : भोकरदन तालुक्यातील विझोरा शिवारात मुख्य रस्त्या लगत तलाव आहे. या तलावास दोन ठिाकणी मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी काही दिवसापासून वाया जात आहे.

विझोरा तलावास गळती
वालसावंगी/धावडा : भोकरदन तालुक्यातील विझोरा शिवारात मुख्य रस्त्या लगत तलाव आहे. या तलावास दोन ठिाकणी मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी काही दिवसापासून वाया जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तात्काळ दुरूस्ती न केल्यास सर्वपाणी वायाजाण्याचीी भीती काही जागरुक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
विझोरा येथील लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने येथे हा तलावा करण्यात आलेला आहे. परंतु काही दिवसापासुन या तलावाच्या सांडव्याच्या भिंती खालून दोन मोठे भगदाड पडले आहे. सांडव्याची भिंत पाच ते सहा फुट उंच आहे. एकीकडे शासनाचे पाणी आडवा पाणी जिरवा धोरण असून मात्र दुसरीकडे मात्र नियोजन शुन्य कारभारामुळे पाणी वाया जात आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत नुकतेच नदी, नाल्यावर वनराईबंधारे तयार करून आडवा, पाणी जिरवा ही मोहीम सुरु आहे. . मात्र येथे अडलेलेच पाणी वाया जात असेल तर याला काय म्हणावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
या भगदाडामुळे पाणी वाया जात असल्याने तलावातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात दिवसेदिवस कमी होत आहे. त्यामुळे तलाव रिकामे होऊन भीषण पाणीटंचाई निर्माण होईल.
या परिसराताील शेतकऱ्यांना तलाव भरल्याने पाण्याची टंचाई भासत नव्हती. मात्र पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण रिकाम्या होत आहे. याची मात्र पाटबंधारे विभागास काही देणेघेणे नसल्याचे येथील शेतकरी जाबेर शहाशहा खान पठाण,अस्लम शहा पठाण, राउबा टेंबरे, साजिद पठाण, राजू टेंभरे यांच्यासह शेतकऱ्यानी सांगितले.
या परिसरातील पाणी पातळी झपाटयाने कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मका, कपाशी, सोयाबीन या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदील आहे. या तलावामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येते.
विशेष हा तलाव एका आश्रम शाळेला लागुन आहे. या तलावामुळे शाळेस पिण्याच्या पाणी प्रश्न तात्पुरता मिटला असतांना व विझोरा गावासही या धरणातच पाणीपुरवठ्याची विहीर आहे. पाणी वाया जात असल्याने भविष्यात परिसरातील तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
एकतर सिंचन क्षेत्र कमी आहे. शासन सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देत आहे. असे असले तरी तलावातून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. याकडे पाटबंधारे विभागासह अन्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भगदाड तात्काळ बुजवावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)