प्रवासी,पर्यटकांना विद्रुपीकरणाचे दर्शन...

By Admin | Updated: March 14, 2016 00:53 IST2016-03-14T00:45:07+5:302016-03-14T00:53:45+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी, बीबीका मकबरा, पाणचक्की ही पर्यटन स्थळे आहेत.

Visitors, Visitors, Visitors ... | प्रवासी,पर्यटकांना विद्रुपीकरणाचे दर्शन...

प्रवासी,पर्यटकांना विद्रुपीकरणाचे दर्शन...

विविध प्रश्नांवर चर्चा : वित्तमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन
भद्रावती : नगर परिषद भद्रावतीतर्फे आयोजित नागपूर विभागस्तरीय नगराध्यक्ष सुवर्ण चषक स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेच्या निमित्त्याने नागपूर विभागातील ६७ नगर परिषदांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र नगर पालिका भद्रावतीच्या सभागृहात रविवारी रंगले. या चर्चासत्रात विविध विषयांवर चर्चा झाली.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी उमरेडचे नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर होते. यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, मूलच्या नगराध्यक्षा रिना थेरकर, आर्वीचे नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित, उमरेडचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, भद्रावतीचे मुख्याधिकारी विनोद जाधव, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुंदडा, ब्रह्मपुरीचे मुख्याधिकारी मंगेश खवले, मूलचे मुख्याधिकारी रवींद्र ढाके, राजुराचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
नगरपालिका कर्मचारी, पदाधिकारी व नगराध्यक्ष यांचे राज्य तथा राष्ट्रीयस्तरावरही प्रशिक्षण झाले पाहिजे, नगरपालिका स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक स्त्रोत नगर पालिकीने वाढविणे गरजेचे असून शासनाने नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीचे अभियान चालवाला पाहिजे, प्रामुख्याने अतिक्रमण करणारे छोटे व्यावसायिक तथा गरीब नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्काची जागा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शासनाने देण्यात यावे, शासनाद्वारे नगरविकास विभागाचा निधी वाढविण्यात यावा तसेच नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या कर्मचारी व इमारतीबाबतच्या अडचणी सोडविण्यात याव्या, १९९३ च्या पूर्वीचे रोजंदारी कर्मचारी शासनातर्फे शासन सेवेत कायम करण्यात आले. मात्र १९९३ ते २००० पर्यंतचे जे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी १८ ते २० वर्षानंतरही रोजंदारीवरच आहेत. शासनाने त्यांना त्वरीत स्थायी करावे, विकासात्मक कार्यासाठी जनसंपर्क करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या धर्तीवर नगरपालिकांमधील नगरसेवकांना मानधन देण्यात यावे. नगरविकास विभागाचे प्रत्येक जिल्हा कार्यालय, आयुक्त कार्यालय संचालनालय कार्यालय याचे सशक्तीकरण करून येथील मणुष्यबळही वाढविण्यात यावे, या प्रमुख विषयांवर चर्चासत्रात चर्चा झाली.याबाबतचे निवेदन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व आ. बाळू धानोरकर यांना देण्याचा निर्णय झाला. चर्चासत्रात नागपूर विभागातील ६७ नगर पालिका मधील अधिकारी व पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Visitors, Visitors, Visitors ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.