कारवाईच्या भीतीने दुकानदार अधिकाऱ्याच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:04 IST2021-05-17T04:04:06+5:302021-05-17T04:04:06+5:30

लाडसावंगी : येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी मोफत धान्य योजनेवर दुकानदारी सुरू केली असून, पैसे आकारून मोफत धान्याची विक्री ...

Visiting the shopkeeper officer for fear of action | कारवाईच्या भीतीने दुकानदार अधिकाऱ्याच्या भेटीला

कारवाईच्या भीतीने दुकानदार अधिकाऱ्याच्या भेटीला

लाडसावंगी : येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी मोफत धान्य योजनेवर दुकानदारी सुरू केली असून, पैसे आकारून मोफत धान्याची विक्री केली. शनिवारी प्रत्येक दुकानदारांची चौकशी केली असता कारवाई होणार या भीतीने रविवारी दिवसभर येथील दुकानदार अधिकाऱ्यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद तालुक्यात लाडसावंगी हे लोकसंख्येने मोठे गाव आहे. या गावात पाच स्वस्त धान्य दुकान आहेत. प्रत्येक महिन्यात औरंगाबाद तालुक्यातील पुरवठा विभाग लाडसावंगी गावाला सर्वात प्रथम धान्य पुरवठा करते. यात शासनाने एप्रिल व मे महिन्यात रेशनकार्डधारकांना प्रतिमाणसे तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत वाटण्याचे आदेश दिले होते. परंतु लाडसावंगी येथील पाच स्वस्त धान्य दुकानदाराने संगनमत करून १२ ते १४ मेदरम्यान पैसे घेऊन धान्य वितरण केले होते. यात पंचायत समिती सदस्य अर्जुन शेळके यांच्या तक्रारीवरून शनिवारी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांनी प्रत्येक दुकानावर जाऊन पंचनामा केला होता. गावातील नागरिकांनी पथकासमोर आम्हाला पैसे घेऊन धान्य वितरण केल्याचे सांगितले होते. आता कारवाई होणार हे निश्चित आहे, या भीतीने रविवारी पाचही दुकानदार औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाई टाळली जावी, यासाठी त्यांचा हा आटापिटा होता. शनिवारी चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची तर ही भेट नव्हती ना, अशी चर्चा गावात रंगली होती.

कारवाई होणार की नाही चर्चा

एकीकडे कोरोना महामारीत गोरगरिबांचे खाण्याचे वांदे होत आहेत. शासन गरिबांना दिलासा देण्याचे काम करत आहे. यात लाडसावंगी येथील स्वस्त धान्य दुकानदार पैसे वसूल करीत होते. या दुकानदारांवर खरच कारवाई होणार की नाही, अशी चर्चा लाडसावंगी बाजारपेठेत रंगली आहे.

Web Title: Visiting the shopkeeper officer for fear of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.