टोकुशिमा विद्यापीठ शिष्टमंडळाची ‘बामु’ला भेट

By Admin | Updated: October 18, 2014 00:04 IST2014-10-18T00:02:20+5:302014-10-18T00:04:52+5:30

औरंगाबाद : जपानमधील टोकुशिमा विद्यापीठ प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास भेट दिली.

Visit to Tukushima University delegation to 'Bamu' | टोकुशिमा विद्यापीठ शिष्टमंडळाची ‘बामु’ला भेट

टोकुशिमा विद्यापीठ शिष्टमंडळाची ‘बामु’ला भेट

औरंगाबाद : जपानमधील टोकुशिमा विद्यापीठ प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास भेट दिली. जून महिन्यात या दोन विद्यापीठांत संशोधनासंदर्भात सामंजस्य करार झाला होता. त्याअंतर्गत ही भेट होती.
या शिष्टमंडळात टोकुशिमा विद्यापीठातील डॉ. तोशिहिरो मोरिगो, डॉ. मसाओ नागासे, डॉ. मिकानो यासुझावा, डॉ. टोमोकी याबुनानी, डॉ. दाईसुके योनेपुरा यांचा समावेश आहे. मूळचे भारतीय व सध्या टोकुशिमा विद्यापीठात अभियांत्रिकी विभागात कार्यरत डॉ. पंकज कोइनकर हेही यावेळी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. धनराज माने व ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडिंग केंद्र,नॅनो टेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, श्रीनिवास रामानुजन चेअर या विभागातील प्रयोगशाळांना शिष्टमंडळाने भेटी दिल्या.
शिष्टमंडळाला संबंधित विभागप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. रामफल शर्मा, डॉ. गुलाब खेडकर, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. सचिन देशमुख, संतोष गायकवाड, अजय नागणे यांनी माहिती दिली. रात्री ८ वाजता कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासोबत या टोकुशिमा विद्यापीठातील प्राध्यापकांची बैठक झाली. शनिवारी हे शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असणार आहे.

Web Title: Visit to Tukushima University delegation to 'Bamu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.