रांजणगावात विश्वकर्मा जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 18:22 IST2019-02-17T18:22:04+5:302019-02-17T18:22:52+5:30
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव येथे सुतार समाजातर्फे रविवारी भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

रांजणगावात विश्वकर्मा जयंती साजरी
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव येथे सुतार समाजातर्फे रविवारी भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता राजगुरु तर प्रमुख पाहुणे म्हणून फौजदार लक्ष्मण उंबरे, प्रशांत गंभीराव, संजय मिसाळ हे होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला सुधीर कांबळे, मनोज राजहंस, दिनेश सांगुले, निलाक्षी राजगुरु, विठ्ठल पवार, निता राजगुरु, गंगाधर जाधव, अंबादास शिंदे, प्रविण भागवत, नाना पागोडे, पराग मुंगीकर, पोहेकाँ. संघराज दाभाडे, किशोर मुळवंडे, आकाश मोरे, बाळू काळे आदींची उपस्थिती होती.