विष्णू-महादेवाची यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 23:37 IST2017-04-09T23:33:45+5:302017-04-09T23:37:18+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीसह सांगवी (काटी), पिंपळा (बु), पिंपळा (खु) या चार गावांचे ग्रामदैवत असलेल्या विष्णू- महादेव वार्षिक यात्रा महोत्सव शनिवारी पालखी कावड मिरवणुकीने साजरा झाला़

विष्णू-महादेवाची यात्रा उत्साहात
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीसह सांगवी (काटी), पिंपळा (बु), पिंपळा (खु) या चार गावांचे ग्रामदैवत असलेल्या विष्णू- महादेव वार्षिक यात्रा महोत्सव शनिवारी पालखी कावड मिरवणुकीने साजरा झाला़
तामलवाडी येथे जागृत विष्णू महादेव मंदिरात शनिवारी व रविवारी दोन दिवस धार्मिक कार्यक्रम चालले. शनिवारी चैत्र द्वादशी दिवशी सकाळी मूळ मूर्तीस अभिषेक घालून यात्रेस प्रारंभ झाला. रात्री कावड मिरवणुकीत खास अक्कलकोट येथून हलगी पथक पाचारण केले होते. पालखीची वाजत-गाजत हर हर महादेव गजरात मिरवणूक काढण्यात आली़ रविवारी दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. प्रसादासाठी गुळ-खोबऱ्याची शेरणी म्हणून वाटण्यात आली़ तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गिरीराज गुप्ता या शेतकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद व मालपाणी परिवारातर्फे थंड पाण्याची सोय करण्यात आली होती़ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सुधीर पाटील, सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे, शहाजी लोंढे, सर्जेराव गायकवाड, मारुती पाटील, सुधाकर लोंढे, शिवदास पाटील, ज्ञानेश्वर जगताप, जगन्नाथ गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. पाच वाजता यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड घेण्यात आला. भागातील मल्लांनी सहभाग नोंदविला होता.
सांगवी (काटी) येथे शिंगणापूर येथील शिवपार्वती सोहळ्यासाठी गेलेल्या कावडीचे पाच वाजता गावात आगमन झाले. रंगीबेरंगी कागदांनी सजवलेल्या काठ्याची वेशीच्या आत उभारणी करून विधिवत पूजा केली. रात्री आठ वाजता काठी कावड व पालखीची मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला. यात्रेनिमित्त मंदिर शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेसाठी देविदास मगर, गोवर्धन मगर, भुजंगे सांगवीकर, आप्पाराव मगर, साधू शिंदे, भीमराव मगर, मधुकर मगर, उपसरपंच हरिभाऊ मगर यांच्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यात्रेनिमित्त भाविकांना बाळासाहेब शामराव मगर यांचे कीर्तन घरोघरी महाप्रसादाचे वाटप केले. पिंपळा (क), पिंपळा (खु) येथेही नियोजित कार्यक्रम यात्रेनिमित्त पार पडले. तामलवाडी पोलिसांनी चारही गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)