कोहळीच्या अंगणवाडी निधीत घोटाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:33 IST2017-07-21T00:28:07+5:302017-07-21T00:33:17+5:30
हदगाव : दोन अंगणवाड्यांसाठी मंजूर १० लाख ५० हजारासाठी ३ लाख ३० हजार रुपये निधी उचलूनही एकाही अंगणवाडीचे काम सुरू न केल्याने हा निधी परत गेला़

कोहळीच्या अंगणवाडी निधीत घोटाळा?
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : दोन अंगणवाड्यांसाठी मंजूर १० लाख ५० हजारासाठी ३ लाख ३० हजार रुपये निधी उचलूनही एकाही अंगणवाडीचे काम सुरू न केल्याने हा निधी परत गेला़ त्यामुळे अंगणवाडीचे काम रखडले व उचललेला निधी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी हडप केल्याची तक्रार गावातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली़ या आरोपाचा मात्र सरपंचांनी स्पष्ट शब्दात इंकार केला़.
तक्रार करूनही बीडीओंनी लक्ष न दिल्यामुळे ग्रामस्थांनी ८ जून २०१७ रोजी एक दिवसीय उपोषणही केले़ त्यानंतर बीडीओंनी चौकशी करतो असे सांगून लेखी दिले़ चौकशी करण्याऐवजी संबंधितांना बोलावून उचललेल्या निधीचे काम लवकर करा, असे सांगितले़ याला तक्रारकर्त्यांनी विरोध केला़ कोहळीतील अंगणवाडी क्ऱ३ साठी ४ लाख ५० हजार, २ साठी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता़ यातील अंगणवाडी क्ऱ३ चे १ लाख ८० हजार व अंगणवाडी क्ऱ२ मधील १ लाख ५० हजार रुपये उचलल्याचे चौकशीत निष्पन्न झाले़ माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आली़ मात्र कारवाई झाली नाही़ बीडीओ संबंधितांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांचा आहे़