मन्नेरवारलू संघर्ष समितीचा विराट मोर्चा
By Admin | Updated: February 27, 2016 00:01 IST2016-02-26T23:55:06+5:302016-02-27T00:01:56+5:30
किनवट : आदिवासी मन्नेरवारलू संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर विराट धिक्कार मोर्चा काढण्यात आला़

मन्नेरवारलू संघर्ष समितीचा विराट मोर्चा
किनवट : खोटे गुन्हे रद्द करावेत, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच आदिवासी संशोधन केंद्राचे आयुक्त व इतरांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी २६ फेब्रुवारी रोजी आदिवासी मन्नेरवारलू संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर विराट धिक्कार मोर्चा काढण्यात आला़
बोगस जात प्रमाणपत्र काढल्याच्या आरोपावरून समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले़ यामुळे समाजाच्या संवैधानिक अधिकारावर गदा आली़ भारत सरकारच्या गॅझेटमध्ये मन्नेरवारलू ही जमात औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे नमूद आहे़ असे असतानाही समाज बांधवावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले, असे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते़
कलावती गार्डन येथून दुपारी १२़३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली़ १़२५ वाजता उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले़
माजी आ़ गंगाराम ठक्करवाड, व्यंकट भंडरवार, मंगाराणी अंबुलगेकर, सविता कंठेवाड, बापूराव पुज्जलवाड, प्रवीण जेठेवाड, अमितकुमार कंठेवाड, रामरेड्डी आईटवाड, पुरुषोत्तम येरडलवाड आदींनी केले़ नंतर एका शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ (वार्ताहर)