शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

गर्जेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवणारा खिरोळकर स्वत:च सस्पेंड; पण गर्जेवर मात्र सरकार मेहरबान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 20:10 IST

विनोद खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले.

छत्रपती संभाजीनगर : अपर तहसीलदार नितीन गर्जे एका लाचेच्या प्रकरणात गुंतल्याचे १५ मे रोजी समोर आले. २७ दिवसांपासून त्याच्यावर कुठलीही कारवाई शासन स्तरावरून झाली नाही. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव निलंबित उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरने पाठविला होता. मात्र, खिरोळकर स्वत:च २७ मे रोजी लाचेच्या प्रकरणात अडकला, निलंबितही झाला. मात्र, गर्जेवर कारवाई होत नसल्याने सरकार त्याच्यावर मेहरबान असल्याचे बोलले जात आहे.

खिरोळकरने वर्ग २ मध्ये वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याचे किती प्रस्ताव मंजूर केले, त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्या समितीमध्ये आणखी दोन कर्मचारी वाढवून दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीकडून चौकशी सुरू आहे. पंधरा दिवसांत ही चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे. खिरोळकरच्या काळात ८८ प्रकरणांना मंजुरी दिली गेल्याचे बोलले जात असले, तरी मुळात ही संख्या कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी सूचिता शिंदे, लेखाधिकारी विनोद शास्त्री, तहसीलदार रूपा चित्रकसह एक महसूल सहायक चौकशी समितीत असून त्यात दोन कर्मचारी आणखी वाढविले आहेत.

१३ महिन्यांत वाढविले नेटवर्कखिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले. खिरोळकरचा पंटर ‘के. एम.’ ला हाताशी धरून त्याने मोठे नेटवर्क उभारले. प्रशासकीय निर्णयात बाहेरच्या खासगी व्यक्तींना ढवळाढवळ करण्याची संधी दिली. याकडे प्रशासनातील सर्व यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे हा सगळा प्रकार घडला. तिसगाव येथील वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खिरोळकर आणि महसूल सहायक त्रिभुवन यास २७ मे रोजी अटक झाली होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcollectorजिल्हाधिकारीsuspensionनिलंबनRevenue Departmentमहसूल विभाग