विनय, तेजस्वी, भगवान, माधुरी, अशोक, सुनीती अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:45 IST2018-03-05T00:44:00+5:302018-03-05T00:45:25+5:30
जागतिक किडनी दिनानिमित्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटलतर्फे रविवारी झालेल्या किडनीथॉन मॅरेथॉनमध्ये १0 कि.मी.मध्ये विनय ढोबळे, तेजस्वी बनसोडे, भगवान कच्छवे, माधुरी निमजे, अशोक अमाणे, सुनीती आंबेकर यांनी अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी.मध्ये नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, सोनम शर्मा, यशवंत कामठे, अलका कदम, ईशा आसेगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

विनय, तेजस्वी, भगवान, माधुरी, अशोक, सुनीती अव्वल
औरंगाबाद : जागतिक किडनी दिनानिमित्त युनायटेड सिग्मा हॉस्पिटलतर्फे रविवारी झालेल्या किडनीथॉन मॅरेथॉनमध्ये १0 कि.मी.मध्ये विनय ढोबळे, तेजस्वी बनसोडे, भगवान कच्छवे, माधुरी निमजे, अशोक अमाणे, सुनीती आंबेकर यांनी अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी.मध्ये नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, सोनम शर्मा, यशवंत कामठे, अलका कदम, ईशा आसेगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
ढोल-ताशा आणि लेझीमच्या निनादात आज सकाळी चैतन्यपूर्ण वातावरणात झालेल्या १0 कि. मी. मॅरेथॉनचा मार्ग हा सिग्मा हॉस्पिटल, अमरप्रीत, सिडको बसस्थानकाच्या पुलाखालून पुन्हा त्याच परतीच्या मार्गाने होता, तर ५ कि. मी.चा मार्ग हा सिग्मा हॉस्पिटल, सावरकर चौक, अमरप्रीत आणि त्याच मार्गाने होता. समारोप सिग्मा हॉस्पिटलनजीकच्या मैदानावर झाला. या मॅरेथॉनमध्ये १२00 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
निकाल १0 कि. मी. (४0 वर्षांखालील पुरुष ) : १. विनय ढोबळे, २. किरण मात्रे, ३. वैभव जोगदंड. महिला : १. तेजस्वी बनसोडे, २. आरती चौधरी, ३. कविता लहाने. ५0 वर्षांखालील पुरुष : १. भगवान कच्छवे, २. राजेश साहू, ३. प्रशांत भाले. महिला : १. माधुरी निमजे, २. विठाबाई कच्छवे, कविता जाधव. ५१ वर्षांपुढील (पुरुष) : १. अशोक अमाणे, २. केशव मोटे, ३. दिनकर शेळके. महिला : १. सुनीती आंबेकर, २. एलविना काळबांडे, ३. मीना छापरवाल. ५ कि. मी. (४0 वर्षांखालील पुरुष) : १. नितीन तालिकोटे, २. रोवू वाघ, ३. अविनाश दाणे. महिला : १. दीपाली तुपे, २. निकिता बहमनावत, ३. अश्विनी राऊत. ५0 वर्षांखालील (पुरुष) : १. राम लिंभारे, २. शेषराव उदर, ३. चंद्रशेखर संगेवार. महिला : १. सोनम शर्मा, २. सुनंदा घोलप, ३. प्रतिमा बोराडे. ५0 वर्षांवरील (पुरुष) : १. यशवंत कामठे, २. दिलीपकुमार चेचानी, ३. सीताराम होवल. महिला : १. अलका कदम, २. सबरिना महाजन, ३. प्रतिमा देशपांडे. तत्पूर्वी, सकाळी चैतन्यपूर्ण वातावरणात आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर, वीरजी सफाया, अविनाश आघाव, सिग्मा हॉस्पिटलचे चीफ मेडिकल डायरेक्टर उन्मेष टाकळकर, मनीषा टाकळकर, डॉ. रमेश रोहिवाल, रामेश्वर थोरात, मुर्तुजा अंबावाला, गोवर्धन कोळेकर, जे. के. जाधव, पुष्पा कोडलिकेरी, डॉ. सचिन सोनी, डॉ. सोनाली साबू, डॉ. श्रीगणेशा बर्नेला यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. बक्षीस वितरण लोकमत महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, सिग्मा हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मनीषा टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे आदींच्या हस्ते झाले. डॉ. प्रफुल्ल जटाळे यांनी पेसर्सचे प्रमुख काम पाहिले.