गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त; दीड लाखांचे रसायन नष्ट

By Admin | Updated: June 19, 2017 23:46 IST2017-06-19T23:42:00+5:302017-06-19T23:46:04+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील चनई शिवारातील मेंढीपालन केंद्राजवळच्या खदानीतील दोन गावठी दारूभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या.

The villain destroyed the bastards; One and a half million chemicals destroyed | गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त; दीड लाखांचे रसायन नष्ट

गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त; दीड लाखांचे रसायन नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील चनई शिवारातील मेंढीपालन केंद्राजवळच्या खदानीतील दोन गावठी दारूभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. यामध्ये दीड लाखांचे रसायन नष्ट केले असून, दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेकायदेशीररित्या रसायनासह हातभट्टीची दारू तयार करण्यात येत असल्याच्या माहितीआधारे पोलिसांनी सोमवारी सकाळी ९ वाजता छापा मारला. दोन दारुभट्ट्या उद्ध्वस्त करून गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आले. तसेच दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये चार घोडे, रिकामे पिंप यांचा समावेश आहे. हुसेन चंदू साखरवाले आणि भिका लाल रेगीवाले (दोघेही रा. गवळीपुरा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, जुम्मा भुऱ्या चौधरी आणि हसन लाल चौधरी हे दोघे फरार झाले. सदरील चारही आरोपींविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The villain destroyed the bastards; One and a half million chemicals destroyed