तलाठ्यावरील कारवाई विरूद्ध ग्रामस्थ एकवटले

By Admin | Updated: June 9, 2015 00:23 IST2015-06-09T00:23:35+5:302015-06-09T00:23:35+5:30

जालना : तालुक्यातील पाष्टा सजाचे तलाठी एम.एस. अंभोरे यांच्या विरूद्ध गावातील काही मंडळीनी खोट्या तक्रारी केल्याने त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे

The villagers concentrated against the police action | तलाठ्यावरील कारवाई विरूद्ध ग्रामस्थ एकवटले

तलाठ्यावरील कारवाई विरूद्ध ग्रामस्थ एकवटले


जालना : तालुक्यातील पाष्टा सजाचे तलाठी एम.एस. अंभोरे यांच्या विरूद्ध गावातील काही मंडळीनी खोट्या तक्रारी केल्याने त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. ती त्वरीत मागे घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी चिंचकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जालना तालुक्यातील पाष्टा, पिंपळवाडी येथील तलाठी अंभूरे यांच्या बद्दल ग्रामस्थांच्या काही तक्रारी नाहीत.
मात्र गावातील काही मंडळीनी त्यांच्या स्वार्थासाठी हेतुपुरस्कर चांगल्या अधिकाऱ्याला त्रास देवून त्याच्या बदलीचे षडयंत्र रचले असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या या निवेदनात नमुद केले आहे.
त्यामुळे अंभोर यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.
या शिष्टमंडळात अंबादास ईलग, नंदकिशोर देशमाने, नारायण खराडकर, संतोष पोमणे, विनायक भालेराव, दत्ता पोमणे, किसन गाढवे, दत्तोमय देशमाने, नारायध ईलग, आश्रुबा पोमणे, दिगाबर नागरे संजय पोमणे, रामेश्वर नागरे, श्रीमंत सानप आदींचा सहभाग होता.
(प्रतिनिधी)

Web Title: The villagers concentrated against the police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.