अन् वडोद बाजार ग्रामस्थ वळले पुन्हा लसीकरणाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST2021-04-12T04:04:52+5:302021-04-12T04:04:52+5:30

गावातील एका व्यक्तीला कोरोना लस घेतल्यानंतर काही दिवसानंतर कोरोनाची लागण झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीबाबत ...

The villagers of Anvadod Bazaar turned to vaccination again | अन् वडोद बाजार ग्रामस्थ वळले पुन्हा लसीकरणाकडे

अन् वडोद बाजार ग्रामस्थ वळले पुन्हा लसीकरणाकडे

गावातील एका व्यक्तीला कोरोना लस घेतल्यानंतर काही दिवसानंतर कोरोनाची लागण झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीबाबत साशंकता निर्माण झाली. गैरसमज पसरला; मात्र आरोग्य केंद्राच्या वतीने सातत्याने लसीकरणाबाबत जनजागृती केली गेली. नायब तहसीलदार प्रशांत काळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात जनजागृती केली. ग्रामपंचायतीने देखील गावकऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर केला. त्यानंतर पुन्हा ग्रामस्थ लसीकरणाकडे वळू लागले आहे. लसीकरण शिबीराला पं. स. सभापती सविता फुके, जिल्हा परिषद सभापती किशोर बलांडे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भाले यांनी भेट दिली. तर डॉ. चोपडे, सरपंच पाकिजा पठाण, उपसरपंच, गोपाळ वाघ, तलाठी निलेश आहेर, माजी उपसभापती कडूबा म्हस्केेे, शेरखा पठाण, डॉ. गोविंद पांडेजी, डॉ. सुभाष वायकोस, अरूण वायकोस, शुभम गंगावणे, सोसायटी चेअरमन दौलत वाघ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The villagers of Anvadod Bazaar turned to vaccination again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.