गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:31+5:302021-07-07T04:06:31+5:30
घाटनांद्रा : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट्रात अनेक प्रकारचे संत होऊन गेले. या संतांनी आपल्याला जगणं शिकविले. संत ...

गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी
घाटनांद्रा : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट्रात अनेक प्रकारचे संत होऊन गेले. या संतांनी आपल्याला जगणं शिकविले. संत साहित्यातून विविध प्रकारच्या लोककला आपल्याकडे आजही जोपासल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटात अनेक कलावंत घरीच होते. ते निर्बंध शिथिल झाल्याने गावोगावी प्रबोधनाची कामे करू लागले आहेत.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे गावागावात येणारे वासुदेव, पोतराज, बहुरूपी या कलावंतांचे विनोदी डायलॉग, वासुदेवाची गाणी बंद झाली आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात कमी झाला. शासनाचे लावलेले निर्बंध शिथिल केले आहेत. तब्बल दीड वर्षांपासून बाहेर न पडलेले हे कलावंत गावोगावी जाऊन आपली कला सादर करून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागले आहेत. त्यामुळे गावागावात आईचा पोतराज, बहुरूपी, सकाळी सकाळी ऐकू येणारी वासुदेवाची गाणी पुन्हा कानी पडू लागली आहेत.
घाटनांद्रा गावात जालना जिल्ह्यातील खाजेगाव येथील रमेश गवळी हा तरुण वासुदेवाची वेशभूषा करून सकाळीच प्रबोधनाचे काम करत असल्याचे दिसून आले. खूप दिवसांनी मंजूळ स्वर ग्रामस्थांच्या कानी पडल्यावर त्यांचे समाधान झाल्याशिवाय राहिले नाही.
060721\159-img-20210706-wa0016.jpg
घाटनांद्रा गावात वासुदेव आला रे वासुदेव आला