ग्रामस्थांनीच नेमला शिक्षक
By Admin | Updated: October 1, 2014 01:07 IST2014-10-01T00:36:26+5:302014-10-01T01:07:44+5:30
उटवद : येथील जिल्हा परिषद चैतन्यपुरी विद्यालयालयात गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत फक्त एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होेते.

ग्रामस्थांनीच नेमला शिक्षक
उटवद : येथील जिल्हा परिषद चैतन्यपुरी विद्यालयालयात गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत फक्त एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होेते. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने गावातील शालेय समितीने निर्णय घेत शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे.
या विषयी ग्रामस्थांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन दिले आहे. चैतन्युपरी विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत २०० विद्यार्थी आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षक नेमण्यासाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेतील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी नेमला शिक्षक
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये शालेय समितीने एक विशेष बैठक घेऊन शाळेत तात्पुरत्या स्वरुपात भागवत शिंदे या शिक्षकाची नियुक्ती केली. बैठकीत शिक्षकाच्या रिक्तपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर एकमत होऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. यावेळी तुकाराम टेकाळे, लताबाई नन्नवरे, गंगाधरराव शिंदे, प्रल्हादाराव शिंदे, बद्रीनाथ शिंदे, वर्षाताई मोहिते, किसनराव बनसोडे, बळीराम पाडुळे उपस्थित होते. (वार्ताहर)