ट्रॅक्टर रॅलीसाठी गावागावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:06 IST2021-01-25T04:06:26+5:302021-01-25T04:06:26+5:30

यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत प्रा. बाहेती यांनी सांगितले की, २६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत, शेतकऱ्यांना पाठिंबा ...

Village meetings for tractor rallies | ट्रॅक्टर रॅलीसाठी गावागावात सभा

ट्रॅक्टर रॅलीसाठी गावागावात सभा

यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत प्रा. बाहेती यांनी सांगितले की, २६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत, शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून त्याच दिवशी राज्यातही तालुका, जिल्हास्तरावर ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, महाराष्ट्र राज्य किसान सभा सहभागी होणार आहेत.

औरंगाबादमध्ये दुपारी ३ वाजता दिल्लीगेट येथून ट्रॅक्टर रॅली सुरू होणार आहे. याच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते ग्रामीण भागात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. दिल्ली आंदोलनाचे अनुभव सांगत आहेत. यासह मुंबई येथे संयुक्त किसान मोर्चा कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. मनोहर टाकसाळ, अशफाक सलामी, ॲड. अभय टाकसाळ यांची उपस्थिती होती.

Web Title: Village meetings for tractor rallies