विजय झोल, शमशुझमा काझी महाराष्ट्राच्या संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:10 IST2018-01-20T00:09:33+5:302018-01-20T00:10:15+5:30

बडोदा येथे २२ ते २७ जानेवारीदरम्यान होणाºया बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या या संघात मराठवाड्याचा शैलीदार डावखुरा फलंदाज विजय झोल आणि शमशुझमा काझी यांचा समावेश करण्यात आला आहे.

Vijay Zol, Shamsuzzaman Kazi, Maharashtra's team | विजय झोल, शमशुझमा काझी महाराष्ट्राच्या संघात

विजय झोल, शमशुझमा काझी महाराष्ट्राच्या संघात

ठळक मुद्दे२३ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धा : २२ रोजी मुंबईविरुद्ध सलामीची लढत

औरंगाबाद : बडोदा येथे २२ ते २७ जानेवारीदरम्यान होणाºया बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या या संघात मराठवाड्याचा शैलीदार डावखुरा फलंदाज विजय झोल आणि शमशुझमा काझी यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा संघ एमसीएचे सचिव रियाज बागवान यांनी शुक्रवारी पुणे येथे जाहीर केला. २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधारपद नाशिकचा मुर्तुजा ट्रंकवाला भूषवणार आहे.
जालन्याचा विजय झोल आणि नांदेडच्या शमशुझमा काझी यांनी बडोदा येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम विभागीय ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिनिअर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. महाराष्ट्राची सलामीची लढत २२ जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध होणार आहे. दुसरा सामना २४ जानेवारी रोजी बडोदा संघाविरुद्ध होणार आहे. महाराष्ट्राची तिसरी लढत सौराष्ट्रविरुद्ध २५ जानेवारी आणि साखळी फेरीतील अखेरची लढत २७ जानेवारी रोजी गुजरात संघाविरुद्ध होणार आहे. निवड झालेल्या विजय झोल याला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य व प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महाराष्ट्राचा २३ वर्षांखालील क्रिकेट संघ : मुर्तुजा ट्रंकवाला (कर्णधार), विजय झोल, शमशुझमा काझी, जगदीश झोपे, प्रदीप दाढे, मुकेश चौधरी, जय पांडे, प्रशांत कोरे, ओम भोसले, अथर्व काळे, अकीब शेख (यष्टीरक्षक), इझान सय्यद, प्रणय सिंग, गौरव काळे, सिद्धेश वरघंटे.

Web Title: Vijay Zol, Shamsuzzaman Kazi, Maharashtra's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.