‘दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्यात’
By Admin | Updated: July 10, 2014 01:03 IST2014-07-10T00:40:44+5:302014-07-10T01:03:52+5:30
जालना : पुरवठा विभागाशी संबंधित ग्रामदक्षता समित्या, तालुका दक्षता समित्यांच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आज येथे दिले.

‘दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्यात’
जालना : पुरवठा विभागाशी संबंधित ग्रामदक्षता समित्या, तालुका दक्षता समित्यांच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आज येथे दिले.
जिल्हा दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी नायक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक डॉ.अशोक खरात, तहसीलदार जे.डी.दळवी, बालाजी क्षीरसागर, संदीप ढाकणे, विनोद गुंडमवार, छाया पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अन्नधान्याची तपासणी दरमहा पाच तारखेच्या आत केली जाते. या अहवालावरून गोषवारा तयार करून त्याची प्रत दहा तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या. गोदामांची दुरूस्ती करण्याची गरज आहे, त्या संबंधीचे प्रस्ताव तहसीलदारांनी सादर करावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील ज्या गावांच्या धान्य वितरणात अडचणी येत आहे, किंवा ग्रामस्थांना धान्य देणे सोयीचे नाही, अशा दुकानांच्या वितरणाबाबत काही बदल करावयाचे असल्यास तसा प्रस्ताव दाखल करण्यात यावा, तसेच काही ठिकाणी नवीन रास्त भाव दुकानांची गरज असल्यास तसेही प्रस्ताव दाखल करण्यात यावे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले. जी रास्त भाव दुकाने दुसरीकडे जोडली गेली असतील ज्यांना पाच एक वर्षे झाली असतील अशा दुकानांची शून्य ते पाच वर्षातील दुकानांची यादी तयार करून पाठवावी, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.
या बैठकीत किरकोळ कोरोसीन विक्री, हॉकर्सद्वारे केली जाणारी रॉकेल विक्री, एस.एम.सेवा, जिल्ह्यांतील गोदामांची स्थिती, नवीन गोदामांची मागणी, रेशन कार्डचे वितरण आदी विषयावर चर्चा झाली.
या बैठकीनंतर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकही झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी नायक यांच्यासह डॉ. डी. डी. भगत, यू.आर.घाडगे, आनंद कुलकर्णी, सुधीर जायभाये आदी उपस्थित होते.