‘खाकी’तील प्रामाणिकतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:19 IST2017-08-09T00:19:56+5:302017-08-09T00:19:56+5:30
निलेश भोसलेसारख्या हेड कॉन्स्टटेबलने २ लाख ९५ हजार रुपयांची रोख रक्कम परत करुन खाकीतील प्रामाणिकतेचे दर्शन घडविले आहे.

‘खाकी’तील प्रामाणिकतेचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एकीकडे लाच स्वीकारणाºया पोलिसांमुळे खाकी बदनाम होत चालली आहे. तर दुसºया बाजूला निलेश भोसलेसारख्या हेड कॉन्स्टटेबलने २ लाख ९५ हजार रुपयांची रोख रक्कम परत करुन खाकीतील प्रामाणिकतेचे दर्शन घडविले आहे.
नीलेश भोसले हे पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या कार्यालयात कर्तव्य बजावतात. मंगळवारी सकाळी १० वा. ते कामानिमित्त शहर ठाण्याकडे जात होते. याचवेळी एका महिलेने रस्त्यावर पडलेली पिशवी भोसले यांच्या हाती सोपवली. त्यांनी तात्काळ खिरडकर यांना याची माहिती दिली. पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये २ हजार, १०० व १० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले. त्यानंतर याची माहिती तात्काळ शहर ठाण्याला दिली. दोन तासानंतर पैशांचे मालक तेथे आले. पोलिसांनी चोहोबाजुने चौकशी केली, खात्री पटल्यानंतर ही रक्कम संबंधित वाईन शॉपच्या मालकाकडे सुपूर्द करण्यात आली.