VIDEO: औरंगाबादमध्ये केमिकल स्फोटात दोन मुलं जखमी
By Admin | Updated: April 8, 2017 16:16 IST2017-04-08T16:16:22+5:302017-04-08T16:16:22+5:30
ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 8 - किराडपुरा भागात शनिवारी दुपारी एका मिनिटात झालेल्या 2 केमिकल स्फोटात 9 वर्षीय मुलगा ...

VIDEO: औरंगाबादमध्ये केमिकल स्फोटात दोन मुलं जखमी
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - किराडपुरा भागात शनिवारी दुपारी एका मिनिटात झालेल्या 2 केमिकल स्फोटात 9 वर्षीय मुलगा आणि 12 वर्षीय मुलगी जखमी .
वसीम खान छोटू खान आणि इफरा खान (दोघे रा. रहीम कॉलनी )अशी जखमींची नावं आहेत. औरंगाबाद शहरातील रहीम कॉलनीतिल रहिवासी वासिम आणि त्याचा भाऊ सोहेल हे आज दुपारी कीराड्पुरा रोडवरील दूध डेअरीवरुन दूध घेऊन घरी जात होते. इफरा ही त्याच्यामागून जात होती . या डेअरीपासून काही अंतरावर असलेल्या भंगार दुकानासमोर वासिमचा पाय एका पिशवीवर पडला आणि मोठा आवाज होऊन स्पोट झाला. याच वेळी इफराच्याही पायाखाली काहीतरी केमिकल सदृश्य वस्तू आली आणि दुसरा स्पोट झाला . या घटनेनंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व अधिकारी, एटीएस आणि बॉम्ब शोधक पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. हा कार्बाईड स्पोट असावा अशी प्राथमिक माहीती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
{{{{dailymotion_video_id####x844v6n}}}}