शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Video: वारकऱ्यांच्या तब्येतीच्या काळजी, दररोज १० हजार कप पैठणचा चहा देतो दिंडीला तरतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 18:25 IST

माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना पैठणच्या चहाची गोडी; मुक्कामाच्या गावी आधीच लागतो स्टॉल, २३ वर्षांची परंपरा

- संजय जाधवपैठण : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीतील वारकऱ्यांना आता पैठणच्या आयुर्वेदिक चहाची सवय झाली आहे. दिंडी मुक्काम करून पुढील प्रवासाला निघताना पैठणचा चहा घेतल्याशिवाय वारकरी पुढे निघत नाहीत. दररोज १०  हजार कप चहा वारकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून दिला जातो. गेल्या २३ वर्षांपासून पैठण येथील ॲड. किसनराव फटांगडे मामा व त्यांचे सहकारी वारकऱ्यांच्या चहापाण्याची सेवा करत आहेत.

२४ वर्षापूर्वी ॲड. किसनराव फटांगडे हे वारकरी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत सहभागी झाले होते. दरम्यान रस्त्यात पावसाने भिजलेल्या वारकऱ्यांना सर्दी होऊ नये तसेच त्यांना कायम तरतरी रहावी म्हणून उर्जादायी आयुर्वेदिक चहा देण्याची कल्पना फटांगडे यांना सुचली. दुसऱ्या वारीपासून त्यांनी एका ट्रकामध्ये १८ पुरुष सेवेकरी व ३ महिला सेवेकरी सोबत घेत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आयुर्वेदिक चहाची सेवा सुरू केली ती आजतगायत सुरू आहे. 

१० क्विंटल साखर अन ५०० लिटर दुधया आयुर्वेदिक चहासाठी १० क्विंटल साखर,  २५ किलो चहा पावडर, ५०० लिटर दूध, ३ किलो सुठं, १ किलो दालचिनी , १ किलो विलायची, १ किलो जायफळ, १ किलो मिरे,  ३५ खोके बिस्कीट, १३ गॕस टाकी आणि एक पाणी टँकर पथकाच्या सोबत असते. 

मुक्कामाच्या गावी लागतो चहाचा स्टॉलपालखी मुक्कामाच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर पैठणचा चहा या नावाने स्टॉल लावून तयार ठेवण्यात येतो. सकाळी चार वाजेपासून वारकऱ्यांना चहा उपलब्ध असतो. पुढील प्रवासाला निघालेले वारकरी आवर्जून पैठणच्या या आयुर्वेदिक चहाचा आस्वाद घेतात आणि पुढे जातात असे सेवेकरी दशरथ खराद यांनी सांगितले.

माऊलीच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्धवारकऱ्यांना सेवा देण्यासाठी पैठण येथील  ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण दशरथ खराद, जिजा (भाऊ) मीसाळ, सेवानिवृत्त शिक्षक  नामदेव गवळी ,  प्रगतीशील शेतकरी  पांडुरंग औटे (आपेगांव),  ट्रक चालक मीयाभाई सय्यद, कैलास परदेशी , व्यापारी हरीभाऊ तुपे, विजय सारडा, शिवाजी सारडा,  पाणी टँकर चालक अप्पासाहेब दळवे, कीशोर भुजबळ, कृष्णा गरड, मच्छींद्र गलधर,  विजय परदेशी, संजय जाधव, डीगंबर कनसे, संतोष आप्पा ढेरे, मच्छिंद्र गोरे तसेच महिला सेवेकरी गोदाबाई जामदार, कुसुमबाई एरंडे, शकुंतला जाधव आदी सेवेकरी दरवर्षी परिश्रम घेतात. उपक्रमाचा सर्व खर्चाचा भार ॲड. किसनराव फटांगडे उचलत आहेत. माऊली आमच्या कडून ही सेवा करून घेत आहे अशी प्रतिक्रिया ॲड. फटांगडे मामा यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूर