शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video: भांडखोर पत्नीपासून वाचव देवा; पत्नी पीडितांचे वट पौर्णिमेपूर्वी देवाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 19:09 IST

करोडी पत्नी पीडित आश्रम आगळी-वेगळी पिंपळ पौर्णिमा

वाळूज महानगर : भांडखोर पत्नीमुळे संसार उघड्यावर पडलेल्या पत्नी पीडितांनी आज शुक्रवार (दि.२) करोडी येथील आश्रमात आगळी-वेगळी पौर्णिमा साजरी केली. या प्रसंगी पत्नी पिडीतांनी पिंपळाची पुजा करुन व प्रदक्षिणा मारत भांडखोर पत्नीपासून वाचविण्यासाठी देवाला साकडे घातले.

देशात बहुताश कायदे महिलांच्या बाजुने असल्यामुळे अनेक महिला या कायद्याचा दुरोपयोग करुन किरकोळ कारणावरुन आपल्या पतीसोबतच त्याच्या कुटुंबियाविरुध्द तक्रारी करतात. या तक्रारीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पत्नी पीडितांना सावरण्यासाठी अ‍ॅड.भारत फुलारे यांनी करोडीत ६ वर्षापुर्वी आश्रम उभारला आहे. आजघडीला या आश्रमात देशभरातील जवळपास १० हजार २०० पत्नी पिडीतांनी नोंदणी केलेली आहे. या आश्रमात प्रत्येक रविवारी पत्नी पीडितांचा दरबार भरवून  अ‍ॅड.फुलारे हे समुपदेशन करुन पत्नी पीडितांना कायदेशिर मार्गदर्शन करण्यात येते. दरवर्षी पत्नी पीडितांच्यावतीने करोडीतील आश्रमात वट पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. आज शुक्रवारी येथील आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली.

यावेळी पत्नी पीडितांनी विविध घोषणा देत पिंपळाच्या झाडाला १२१ उलट्या प्रदक्षिणा मारत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरा करण्यात आली. या प्रसंगी पत्नी पीडितांना भांडखोर पत्नीपासून पतीला वाचविण्यासाठी देवाला साकडे घालत प्रार्थना केली. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, संजय भांड, प्रविण कांबळे, भिकन चंदन, अ‍ॅड. अमोल घुगे, अ‍ॅड. अमोल होनमाने, श्रीराम तांगडे आदी पत्नी पीडितांची उपस्थिती होती.

महिलासाठी असलेल्या एकतर्फी कायद्यावर बंदीची मागणीया अनोळख्या आंदोलनानंतर पत्नी पीडितांच्यावतीने अ‍ॅड. भारत फुलारे यांनी महिलांसाठी असलेल्या एकतर्फी कायद्यावर बंदी घालण्याची मागणी केली. प्रत्येक पोलिस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, कौटंबिक वाद न्यायालयात गेल्यास एक वर्षाच्या आत प्रकरणी निकाली काढण्यात यावे आदी मागण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याचे अ‍ॅड.फुलारे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न