औरंगाबाद : नारेगाव येथील एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी ४ वाजता घडली. अचानक आग लागल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी आले. गोदामात भंगार असल्याने आग लवकर पसरत गेली. आगीने संपूर्ण गोदाम आपल्वधीत कवेत घेतले. धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत. अग्निशमन दल आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. ( सविस्तर वृत्त लवकरच )
Video: नारेगावातील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 17:25 IST