VIDEO: रेल्वेखाली येऊनही वाचला चिमुरड्याचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 16:00 IST2017-07-08T15:56:41+5:302017-07-08T16:00:30+5:30
ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 8 - देव तारी त्याला कोण मारी...या म्हणीची प्रचिती आणणारी घटना औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहायला ...

VIDEO: रेल्वेखाली येऊनही वाचला चिमुरड्याचा जीव
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - देव तारी त्याला कोण मारी...या म्हणीची प्रचिती आणणारी घटना औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहायला मिळाली जेव्हा एक चिमुरडा रेल्वेखाली आला. रेल्वेखाली येऊनही चिमुरड्याचा जीव वाचल्याने कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला. दैव बलवत्तर होतं म्हणून चिमुरड्याला काहीच झालं नाही, पण जेव्हा घटना घडली तेव्हा मात्र सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमे-यात सर्व घटना कैद झाली आहे.
आणखी वाचा -
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर शनिवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून मनमाड-काचिगुडा पॅसेंजर रवाना होत होती. यावेळी काही प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. कुटुंबियांनी आधी तीन वर्षीय चिमुरड्याला चढवलं आणि नंतर स्वत: चढण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र डब्यातील वाढलेल्या गर्दीमुळे सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले. या गर्दीत तो चिमुरडाही होता, जो ट्रेनखाली आला.
{{{{dailymotion_video_id####x84577f}}}}
अशावेळी एखाद्याचा जीव वाचणं अशक्यच....कोणाचा जी वाचेल यावर कोणी विश्वासही ठेवणार नाही. पण नशीब बलवत्तर होतं म्हणून का काय या दुर्घटनेतून चिमुकला बाल-बाल बचावला. दुर्घटनेनंतर झालेल्या आरडाओरडामुळे रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली, त्यामुळे अनर्थ टळला. इतक्या मोठ्या दुर्घटनेतून चिमुकला बचावल्याने कुटुंबियांचा जीवही भांड्यात पडला. घटनेनंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.