कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय नाही- टोपे

By Admin | Updated: February 10, 2016 00:16 IST2016-02-09T23:57:38+5:302016-02-10T00:16:41+5:30

अंबड : दुष्काळी उपाययोजना करण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उदगार आ. राजेश टोपे यांनी

The victims are not involved in the work - Tope | कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय नाही- टोपे

कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय नाही- टोपे


अंबड : दुष्काळी उपाययोजना करण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे उदगार आ. राजेश टोपे यांनी अंबड पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजना संदर्भात आयोजित बैठकीच्यावेळी काढले.
ते म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्याने सकारात्मक राहून कामे करावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा, मजुराच्या हाताला काम या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांकडे ग्रामसेवकासह इतर सर्व संबंधित विभागाने अतिशय सतर्क राहून काम करावे, कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय करण्यात येणार नाही, असा इशाराही त्यान दिला. मराठवाड्यासह अंबड तालुक्यात चार वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पशुधन जगवायचे कसे हा खूप गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. हाताला काम नाही, चारा छावण्या उभारण्यात सरकार कमी पडत आहे. दुष्काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करण्यासाठी मजूर व कामाचे नियोजन गावनिहाय करावे. व्यसनाधीनतेकडे वळू पाहणाऱ्या ग्रामीण भागातील तरूणांसाठी एमआरईजीएस च्या माध्यमातून गावांमध्ये खेळाची मैदाने तयार करा आणि तरूण वर्गांना खेळाकडे आकर्षित करा, असे आवाहन आ. टोपे यांनी केले.
या बैठकीला जि.प. गटनेते सतीश टोपे, तहसीलदार महेश सावंत, बीडीओ पुरूषोत्तम बनसोड, माजी जि.प.सदस्य मनोज मरकड, जि.प.सदस्य अ‍ॅड. संजय काळबांडे, रजियोद्दीन पटेल, ख.वि.सं.चेअरमन सतीशराव वाघमारे, कृउबा समितीचे सभापती सतीश होंडे, उपसभापती संदीप नरवडे, संजय गावडे, उपसभापती पं.स. मदन जायभाये, पं.स.सदस्य रामदास कुरणकर, सतीश फोके, अभय शेंद्रे, प्रभाकर भरपूर, सुभाष पटेकर, अमोल लहाने, माजी जि.प. सदस्य भाऊसाहेब कनके, ग्रामीण पाणी पुरवठा अनटद, गोब्रागडे, सगदेव, शंभरकर, खनके, भुतेकर, महाजन उपस्थित होते.

Web Title: The victims are not involved in the work - Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.