पद्मावतीत डेंग्यूसदृश्य तापाने घेतला बालकाचा बळी
By Admin | Updated: August 31, 2014 01:08 IST2014-08-31T00:37:59+5:302014-08-31T01:08:06+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात गेल्या आठ दिवसांपासून डेंग््यू सदृश्य तापाची लागण झाल्याने निवृत्ती भालचंद्र गावंडे (५) या बालकाचा तापाने बळी गेला.

पद्मावतीत डेंग्यूसदृश्य तापाने घेतला बालकाचा बळी
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात गेल्या आठ दिवसांपासून डेंग््यू सदृश्य तापाची लागण झाल्याने निवृत्ती भालचंद्र गावंडे (५) या बालकाचा तापाने बळी गेला.
गाव परिसरात काही दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने गावात तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. गावातील अश्विनी गावंडे या बालिकेस औरंगाबाद येथे भरती करण्यात आले.कमलाबाई गावंडे, राणाबाई सपकाळ, अंकुश साळवे, मुकेश साळवे यांनाही तापाची लागण झाल्याने बुलडाणा व वालसावंगी येथील केंद्रातून उपचार सुरु आहेत. जालना येथून आरोग्य पथक गावात दाखल झाले होते. रुग्णंची भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी गावातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात औषधी टाकली. ग्रामपंचायतनेही ताबडतोब धूर फवारणी केली. घरोघरी गोळ्यांचे वाटप केले. गावातील उघड्या नळ जोडण्यांची दुरुस्ती केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून गावात तळ ठोकून आहेत. ग्रामस्थांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या काळजी घेण्याचे अवाहन केले. गावात कोरडा दिवस पाळण्यात आला. काही घरांना भेटी देऊन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले.
गावात महिनाभरातून तीनदा रोहित्र जळाल्याने गाव अंधारात आहे. वीज नसल्याने ग्रामस्थांना डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळेही साथीचे आजार पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणेआहे. ग्रामसेवक इंगळे म्हणले, गावात ताप आहे. पंरतु ती काही दूषित पाण्यामुळे नाही. कारण आम्ही ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. पाण्याचे नमुनेही चांगले आहेत. धूर फवारणी करण्यात आली. गावात स्वछता ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडूनही गावातील रुग्णांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)