छायाचित्राच्या मोहाने तरुणाचा बळी

By Admin | Updated: July 10, 2017 00:48 IST2017-07-10T00:45:37+5:302017-07-10T00:48:17+5:30

औरंगाबाद : छायाचित्र काढण्यासाठी देवळाईच्या साई टेकडी परिसरातील तलावात उतरलेल्या तरुण कराटे प्रशिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

The victim of the photograph is the victim of the youth | छायाचित्राच्या मोहाने तरुणाचा बळी

छायाचित्राच्या मोहाने तरुणाचा बळी


लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छायाचित्र काढण्यासाठी देवळाईच्या साई टेकडी परिसरातील तलावात उतरलेल्या तरुण कराटे प्रशिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. या तलावात महिनाभरातील दोन घटनांत ३ तरुण बुडून मरण पावले आहेत.
सूरज भीमराव जेठे (१९, रा. प्रियदर्शिनी इंदिरानगर, गारखेडा) असे मृताचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, गारखेडा परिसरातील संदीप साखरे हे कराटे प्रशिक्षक आहेत. सूरज त्यांचा विद्यार्थी असून, तो त्यांना कराटे प्रशिक्षक म्हणून मदत करायचा. गुरुपौर्णिमेनिमित्त संदीप साखरे, त्यांची पत्नी, सूरज, भाऊसाहेब कारके, साहिल शेख आणि दोन मुली असे सर्वजण रविवारी दुपारी तीन दुचाकींवरून साई टेकडी येथे गेले. दर्शन घेतल्यानंतर परिसरातील उद्यान आणि तलाव परिसरात फिरण्यासाठी ते गेले. त्यांना कोणालाही पोहता येत नव्हते, त्यामुळे कोणीही पोहायचे नाही, असे ठरले होते. केवळ छायाचित्र काढण्यासाठी गुडघाभर पाण्यात जाऊ असे म्हणून एकापाठोपाठ तलावात गेले. सूरज सर्वांच्या पुढे आणि त्याच्या मागे भाऊसाहेब आणि साहिल होते. 

 

Web Title: The victim of the photograph is the victim of the youth