शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेचे बळी! भूतबाधा झाल्याचे सांगून शिऊरमध्ये अघोरी कृत्य, युवकाला जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:04 IST

याप्रकरणी पोलिसांनी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शिऊर (ता. वैजापूर) : येथील प्रसिद्ध मंदिर बिरोबा परिसरात एका मांत्रिकाने भूत पळविण्याच्या नावाखाली एका तरुणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून या अंधश्रद्धा व अघोरी कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या अघोरी कृत्याचा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे. आरोपी भोंदूबाबा संजय पगार हा मांत्रिक आहे. शिऊर येथील बिरोबा मंदिर परिसरात मांत्रिक पगार याने गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तरुणावर हा अघोरी प्रकार केल्याचे पोलिस कर्मचारी किशोर शांताराम आघाडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी संजय पगार हा बिरोबा मंदिरात बसून समोर बसलेल्या एका व्यक्तीवर भंडारा टाकून त्याला जबरदस्तीने उभे करताना आणि त्याच्या नाकाला बूट लावत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. तसेच दुसऱ्या आणखी एका व्हिडीओत पगार हा भूत उतरवित असल्याचे दिसत आहे.

एका तरुणाला उताणे झोपवून त्याच्या मानेवर पाय देऊन व पोटावर काठी ठेवत 'सोड त्याला, सोड त्याला, नाहीतर धोपटी घालेन' असे म्हणत तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे छत्रपती संभाजीनगर येथील सदस्य रितेश संतोष होळकर यांनी स्टिंग ऑपरेशन केलेले हे व्हिडीओ शिऊर पोलिसांना दिले. पोलिसांनी याची दखल घेत भोंदू बाबा पगारविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक राहुल थोरात हे करीत आहेत. याप्रकरणी अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जनतेची फसवणूक बिरोबा मंदिर परिसरात एका व्यक्तीकडून कथितरीत्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदरील प्रकार गंभीर असून, यामार्फत जनतेची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत आमच्या एका कर्मचाऱ्याने सरकारी फिर्यादी होऊन, ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य रितेश संतोष होळकर (महाराष्ट्र) यांच्याकडे दिली आहे. या तक्रारीच्या आधारे शिऊर पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाइल.- वैभव रणखांब, सहायक पोलीस निरीक्षक, शिऊर

भोंदूगिरीचा धंदाशिऊर ही संतांची भूमी असूनही, तिथेच संत बिरोबाच्या नावाखाली गेली दोन वर्षे जादूटोण्याच्या भोंदूगिरीचा धंदा सुरू आहे. गरीब भक्तांची लूटमार होत असून, हे प्रकार थांबायला हवेत. "खोटं देवाला सहन होत नाही" हेच आता खरे ठरत आहे, असे काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी