कुलगुरूंनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क
By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:50+5:302020-12-02T04:11:50+5:30
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. ...

कुलगुरूंनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व त्यांच्या पत्नी ज्योती येवले यांनी मिलिंद हायस्कूलमधील केंद्रावर सकाळी दहा वाजताच मतदान केले. कुलगुरु मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्या स्थितीतही त्यांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय संवैधानिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांपैकी (कंसात मतदान केंद्राचे नाव) कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी (पीईएस पॉलिटेक्निक कॉलेज), अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. वाल्मिक सरवदे (पीईएस पॉलिटेक्निक), राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे (न्यू इंग्लिश स्कूल, सातारा), व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे (मिलिंद इंग्रजी शाळा), डॉ. राजेश करपे (कृषी महाविद्यालय, पैठण रोड), डॉ. राहुल मस्के (न्यू हायस्कूल, हर्सुल) आदींनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.