१.६० कोटी खर्चून उभारले पशुवैद्यकीय रुग्णालय
By Admin | Updated: August 15, 2014 00:05 IST2014-08-14T23:45:10+5:302014-08-15T00:05:21+5:30
हिंगोली : कळमनुरी येथे १.६0 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या लोकार्पणासह साडेतीन कोटींच्या विविध विकासकामांना १५ आॅगस्ट रोजी होणार

१.६० कोटी खर्चून उभारले पशुवैद्यकीय रुग्णालय
हिंगोली : कळमनुरी येथे १.६0 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या लोकार्पणासह साडेतीन कोटींच्या विविध विकासकामांना १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. राजीव सातव यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून १ कोटीचा शहरातील मुख्य रस्ता, साईनगर येथे ४५ लाखांची पाणीपुरवठा योजना, न. प. मुख्याधिकाऱ्यांचे निवासस्थान, परिसरात संरक्षक भिंत आदी कामांचा प्रारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री रजनी सातव तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. राजीव सातव, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, नगराध्यक्षा यास्मीन बेगम, उपनगराध्यक्ष नाजीम रज्वी उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण
आखाडा बाळापूर येथे उभारलेल्या ३0 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी खा.राजीव सातव, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रजनीताई सातव, जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ.सतीश चव्हाण, आ.रामराव वडकुते, आ. भाऊराव पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, जि.प. सीईओ पी. व्ही. बनसोडे, सरपंच मारोती खरवडे, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंतकुमार बोरसे आदी उपस्थित राहतील. जेतवन नगरातील समाज मंदिराचे लोकार्पण होणार आहे. ग्रामीण रुग्णालयामुळे या भागातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. या कामांसाठी खा.सातव यांनी पाठपुरावा केला होता.