छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणूकीसाठी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी समर्थकांसह अलोट गर्दी केली होती.
सोडतीत शिंदेसेनेत अलीकडेच प्रवेश केलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा पत्ता कट झाला. त्यांना आता पर्यायी प्रभाग शोधावा लागेल. त्यांच्या हक्काच्या प्रभागातील एक जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झाली. या ठिकाणी माजी महापौर अनिता घोडेले निवडणूक लढवू शकतात. त्याचप्रमाणे भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, विधानसभा निवडणूक लढविलेले राजु शिंदे, अलीकडेच भाजपात गेलेले कैलास गायकवाड यांनाही पर्यायी प्रभाग शोधावे लागणार आहेत.
दहा वर्षानंतर महापालिकेची निवडणूक शहरात होत आहे. ती सुद्धा प्रभाग पद्धतीने. या पद्धतीचा अनुभव राजकीय मंडळी आणि मतदार पहिल्यांदाच घेत आहेत. मागील काही दिवसांपासून इच्छुक आरक्षण सोडतीसाठी उत्सुक होते. आता सोडत संपल्यावर पुढील मोठी लढाई तिकीटासाठी राहणार आहे.
आरक्षणाचे चित्र: अनुसूचित जाती (एसस्सी) – २२ – ११ (महिला) – जास्त लोकसंख्या असलेल्या २२ प्रभागात आरक्षणअनुसूचित जमाती (एसटी ) – २ – १ (महिला)– २ प्रभागांमध्ये आरक्षणमागासवर्गीय (ओबीसी) – ३१ – १६ – प्रत्येक प्रभागात १, दोन प्रभागात २ नगरसेवकमहिला (एकूण) – ५८ – सर्वसाधारण महिला सोडून आरक्षीत महिला नगरसेवक २८ आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रभागात २ महिला नगरसेवक अनिवार्य आहे.
पक्षीय बलाबल २०१५शिवसेना २८भाजप २३एमआयएम २४काँग्रेस १२अपक्ष १८बीएसपी ०४राष्ट्रवादी कॉं. ०४रिपाइं (डे) ०२एकूण ११५
Web Summary : Election draw in Chhatrapati Sambhajinagar shakes up political landscape. Key leaders face setbacks, needing new wards. Aspirants celebrate, gearing up for ticket battles. New ward system introduced.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में चुनाव आरक्षण ने राजनीतिक परिदृश्य बदल दिया। प्रमुख नेताओं को नुकसान, नए वार्डों की तलाश। उम्मीदवार उत्साहित, टिकट के लिए तैयार। नई वार्ड प्रणाली शुरू।