पहिल्याच दिवशी नऊ गुरुजींची दांडी

By Admin | Updated: November 25, 2015 23:18 IST2015-11-23T23:53:24+5:302015-11-25T23:18:18+5:30

नळदुर्ग : दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी नऊ शिक्षकांसह एक क्लार्क आणि एका सेवकाने शाळेला दांडी मारल्याचा प्रकार

On the very first day, nine Guruji's Dandi | पहिल्याच दिवशी नऊ गुरुजींची दांडी

पहिल्याच दिवशी नऊ गुरुजींची दांडी


नळदुर्ग : दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी नऊ शिक्षकांसह एक क्लार्क आणि एका सेवकाने शाळेला दांडी मारल्याचा प्रकार येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेत सोमवारी समोर आला.
पंचायत समिती सभापती प्रकाश चव्हाण यांनी सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली. यावेळी येथे कार्यरत असलेल्या २१ कर्मचाऱ्यांपैकी केवळ दहा कर्मचारी आणि ३१४ पैकी २८ विद्यार्थी शाळेत हजर असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या समवेत विस्ताराधिकारी गंगाधर सर्जे हेही उपस्थित होते. दरम्यान, चव्हाण यांनी पंचनामा करून याबाबत तातडीने कारवाई करून सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: On the very first day, nine Guruji's Dandi