वेरूळच्या सानिकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:55 IST2017-11-21T00:54:49+5:302017-11-21T00:55:10+5:30

वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी सानिका महाजन हिची बिकानेर येथे २६ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान होणाºया राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 Verul's pick for Sanica's national tournament | वेरूळच्या सानिकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

वेरूळच्या सानिकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

औरंगाबाद : वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी सानिका महाजन हिची बिकानेर येथे २६ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान होणाºया राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी बिकानेर येथे आयोजित शिबिरासाठी ती नुकतीच रवाना झाली आहे. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सानिका महाजन हिने चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या आधारे तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर, सुकुमार नवले, संस्थेचे अध्यक्ष वर्धमान पांडे, उपाध्यक्ष हर्षवर्धन जैन, सचिव प्रेमचंद पाटणी, कोषाध्यक्ष दिनेश गंगवाल, मदनलाल पांडे, निर्मल ठोळे यांनी तिचे अभिनंदन केले. सानिकाला क्रीडा शिक्षक संजय महाजन, आशिष कान्हेड यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Verul's pick for Sanica's national tournament