नाकाबंदी भेदून शहरात वाहन चोर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST2021-05-19T04:04:06+5:302021-05-19T04:04:06+5:30

सुभेदारी गेस्ट हाउस येथील रहिवासी शाहेद अली शौकत अली यांची मोटारसायकल ( एम एच २० बीझेड ८८००) टाउन हॉल ...

Vehicle thieves break through the blockade | नाकाबंदी भेदून शहरात वाहन चोर सुसाट

नाकाबंदी भेदून शहरात वाहन चोर सुसाट

सुभेदारी गेस्ट हाउस येथील रहिवासी शाहेद अली शौकत अली यांची मोटारसायकल ( एम एच २० बीझेड ८८००) टाउन हॉल येथील हॉटेल मिडटाउन समोरून चोरट्यांनी पळविली. शाहेद यांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. छावणी परिसरातील रहिवासी मोहम्मद शाहीद मसूद शेख यांची मोटारसायकल (एमएच २० सीव्ही ४७८६) चोरट्यांनी १४ मे रोजी सकाळी पानचक्कीजवळून पळविली.

तिसऱ्या घटनेत घाटी रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या पार्किंगमध्ये उभी दुचाकी (एम एच २०बीएम ५४७७) १२ मे रोजी भरदिवसा चोरी झाली. समाजकार्य अधीक्षक नरेंद्र भास्कर भालेराव यांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.

चौथी घटना नागेश्वरवाडीतील प्रियदर्शिनीनगरात १६ मे झाली. चोरट्यांनी घरासमोर उभी मोटारसायकल ( एम एच २० बीयू ०२२०) चोरून नेली. या विषयी विठ्ठलराव आनंदराव शिंदे यांनी क्रांतिचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

अन्य एका घटनेत भावसिंगपुरा परिसरातील गोल्डन सिटी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी मोटारसायकल (एम एच २० डीपी ०८३५) चोरट्यांनी १६ मे रोजी लंपास केली. याविषयी शेख इमरान शेख बापूजी यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

नंदनवन कॉलनीतील परिस धनलक्ष्मी हाउसिंगच्या वाहनतळावरून चोरट्यांनी दुचाकी (एम एच २० बीडी ३७७८) चोरून नेली. १५ मे रोजी रात्री झालेल्या या चोरीविषयी दिलीपकुमार रामचंद्र तिवारी यांनी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.

चोकट

गेल्या काही वर्षांपासून शहरात दुचाकीचोरीचे सत्र कायम सुरू आहे. पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता येथे रुजू झाल्यावर, त्यांनी सर्वप्रथम दुचाकीचोरी रोखण्यावर भर देणार, असे सांगितले होते. गुन्हेशाखेच्या पोलिसांना त्यांनी वाहतूक चौकात नेमले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. गतवर्षीप्रमाणे जानेवारीपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत २२९ वाहने चोरट्यांनी पळविली आहेत.

Web Title: Vehicle thieves break through the blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.