भाजीमंडईत सुटली दुर्गंधी

By Admin | Updated: August 26, 2014 23:56 IST2014-08-26T23:44:08+5:302014-08-26T23:56:51+5:30

हिंगोली : नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भाजीपाला बाजारात घाण आहे की घाणीत बाजार भरतो, हे कळायला मार्ग नाही.

Vegetable sutteen durgundi | भाजीमंडईत सुटली दुर्गंधी

भाजीमंडईत सुटली दुर्गंधी

हिंगोली : नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भाजीपाला बाजारात घाण आहे की घाणीत बाजार भरतो, हे कळायला मार्ग नाही. कित्येक वर्षांपासून बाजार आहे, त्या ठिकाणी आहे. सुविधा वाढण्याऐवजी समस्याच वाढत गेल्या. तरीही हा बाजार नित्यनेमाने भरतो. दुर्गंधी, चिखल, वराह, जनावरांचा वावर असे चित्र कायम असते. याची तमा ना शहरवासियांना ना पालिकेला.
हिंगोली बाजार समितीला जागा अपुरी पडत असल्यामुळे भाजीपाला बाजाराचे नियंत्रन पालिकेकडे सोपवले. साफसफाईपासून दुरूस्तीपर्यंतचे काम पालिकेला करावे लागते. पालिकेकडून उभारणीचे काम तर सोडाच नियमित साफाईसही कर्मचाऱ्यांची अनास्था दिसते. सत्ता बदलली, लोक बदलले, अधिकारी बदलले पण फरक पडला नाही. उन्हाळा आणि हिवाळ्यात घाणीची तीव्रत्ता दिसून येत नाही. पण जसा पावसाळा सुरू झाला तसा घाणीने कळस गाठला. पहिल्याच पावसात चित्र पालटले. आता बाजारात पायही ठेवायला जागा नाही. पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावली नसल्याने रस्त्यावर डोह साचले. नियमित कचरा उचलला जात नसल्याने पाण्यामुळे चिखल तयार झाला. कचऱ्याचे ढीग उचलल्या जात नसल्यामुळे दुर्गंध निर्माण झाली. उग्र वासाच्या दुर्गंधीमुळे नाक दाबून भाजीपाला खरेदी करावा लागतो.
कचराकुंड्या गायब
स्वच्छ शहर सुंदर शहरासाठी पालिकेने जागोजाग कचरा कुंड्या ठेवल्या होत्या. अल्पावधीतच कुंड्या गायब झाल्याने बाजारात रस्त्यावर कचरा टाकण्यावाचून पर्याय नाही. नव्याने कुंड्या ठेवण्याची तसदीही घेतली नाही.
स्वच्छतागृहाची बिकट अवस्था
एकमेव स्वच्छतागृहाची अवस्था पाहण्यासारखी नाही. अर्धा बाजार या स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीनेच आजारी आहे. बांधकामानंतर कधी कोणी त्याकडे ढुंकूनही पाहिले नसावे, हे पाहताक्षणीच जाणवते.
पालिकेकडे अपुरा कर्मचारीवर्ग आहे. मात्र स्वच्छतेकडे लक्ष दिले जाईल, असे नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ म्हणाल्या. (वार्ताहर)

Web Title: Vegetable sutteen durgundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.