लातुरकरांना सोलापूरचा भाजीपाला; भावही कडाडले

By Admin | Updated: December 1, 2014 00:50 IST2014-12-01T00:39:02+5:302014-12-01T00:50:16+5:30

लातूर : वाढती पाणी टंचाई, दुष्काळ सदृष्य परिस्थिती यामुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक घटली असून, पुणे, सोलापूरच्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत़

The vegetable of Solapur; The house also broke | लातुरकरांना सोलापूरचा भाजीपाला; भावही कडाडले

लातुरकरांना सोलापूरचा भाजीपाला; भावही कडाडले


लातूर : वाढती पाणी टंचाई, दुष्काळ सदृष्य परिस्थिती यामुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक घटली असून, पुणे, सोलापूरच्या पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत़ परिणामी पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़
लातूर शहरातील गंजगोलाई, गांधी मार्केट, दयानंद गेट या भागात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचा बाजार भरतो़ यामध्ये दोडका, ५९ ते ६० रुपये प्रतिकिलो, गवार ६०, वांगी ६०, भेंडी ६०, बटाटे ३२ ते ३५, कांदे १५ ते २० , भोपळा २५ ते ३०, पत्ताकोबी १० ते १५, फ्लावर २५ ते ३०, काकडी ३५ ते ४५, गाजर ४० ते ४५, वाटाणा ४० ते ४५, हिरवी मिरची २० ते २५, कोथिंबीर २५ ते ३०, पालक २५ ते ३०, शेवगा ८० ते १००, मेथी १० ते १२ रुपये प्रति पेंडी, लसून ४० ते ५०, टमाटे १५ ते २०, सिमला मिरची ४० ते ५०, लिंबू ३५ ते ४० रुपये या प्रमाणात पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले असल्याचे दिसून येत आहे़
लातुरच्या भाजी मार्केटमध्ये पाणी टंचाईमुळे स्थानिक पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे़ त्यामुळे पुणे व सोलापूर येथून गाजर, बटाटे, शेवगा, बिनीस, मेथी याची आवक होत आहे़ त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झाली असल्याने, सर्वसामान्य कुटुंबाच्या आहारातील पालेभाज्या गायब झाल्या असल्याचे दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The vegetable of Solapur; The house also broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.