भाजीविक्रेत्यांनो आता नियम पाळावे लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:02 IST2021-04-12T04:02:57+5:302021-04-12T04:02:57+5:30
औरंगाबाद : बाजार समितीमधील फळ व भाजीपाल्याच्या आडत बाजारात किरकोळ विक्रेते व ग्राहकांमुळे होणारी प्रचंड गर्दी रोखणे ही जिल्हा ...

भाजीविक्रेत्यांनो आता नियम पाळावे लागतील
औरंगाबाद : बाजार समितीमधील फळ व भाजीपाल्याच्या आडत बाजारात किरकोळ विक्रेते व ग्राहकांमुळे होणारी प्रचंड गर्दी रोखणे ही जिल्हा प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली आहे. आता यावर मार्ग म्हणून जाधववाडी येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्रेत्यांना पिवळे पट्टे मारलेल्या चौकोनातच बसावे लागणार आहे.
भाजी बाजाराचे विकेंद्रीकरून गर्दी कमी करण्यासाठी महानगरपालिकाने शहरातील ४१ ठिकाणी भाजी मंडई भरविण्यास परवानगी दिली होती. पण यास किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. बेकायदेशीरपणे विक्रेते आडत बाजारात येऊन बसत आहे. त्यांना रोखण्यास बाजार समितीलाही अपयश आले आहे.
बाजार समिती आवारात मोठी जागा आहे पण त्याचा वापर केला जात नव्हता मात्र, रविवारी आडत बाजाराच्या बाजूच्या सिमेंट रस्त्यावर बाजार समितीने पिवळे पट्टे मारले आहेत. एका चौकोनात एक विक्रेता बसू शकेल, अशी आखणी करण्यात आली आहे.
असे २०० चौकोन तयार करण्यात आले आहे. एका वेळीस सुरक्षित अंतर ठेवून २०० विक्रेते भाजीपाला, फळे विक्री करणार आहेत.
समितीने २१ खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहे. त्यांचे काम नवीन एजन्सीला दिले आहे.
चौकट
तर कारवाई करणार
विक्रेत्यांनी चौकोनाबाहेर बसण्याचा प्रयत्न केला त्यावर कारवाई करण्यात येईल, राधाकिसन पठाडे
सभापती, कृउबा